कुत्रा पाळा आणि हृद्यविकार, स्ट्रोक टाळा!

कुत्रा पाळा आणि हृद्यविकार, स्ट्रोक टाळा!

फोटो प्रातिनिधिक आहे

बऱ्याच व्यक्तींना पाळीव प्राणी फार आवडतात. पण, प्राण्यांची नियमित निगा, त्यांचे खाणे – पिणे, त्यांना दररोज फिरवणे आणि महत्त्वाचे म्हणजे जागेचा अभाव यामुळे अनेकांना इच्छा असून देखील प्राणी पाळता येत नाही. मात्र, काही ठिकाणी कुत्रा हा सर्रास पाळला जाणारा प्राणी आहे. कारण कुत्रा हा घराचे रक्षण करतो. परंतु, तो फक्त घराचेच रक्षण नाहीतर घरातील प्रत्येक व्यक्तीला हृदयविकारापासून देखील दूर ठेवतो, असे एका अहवालातून समोर आले आहे.


पहा – हा ‘कुत्रा’ इंस्टाग्रामवरुन कमावतोय लाखो


असा आहे अहवाल

अमेरिकने हार्ट असोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार, कुत्रे पाळणाऱ्या व्यक्तीचे आयुर्मान अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच ज्या व्यक्ती घरात कुत्रा पाळतात त्या व्यक्तींना हृदय विकार आणि स्ट्रोकचा धोका कमी असतो. त्याचप्रमाणे काही व्यक्ती या घरामध्ये एकट्या राहातात अशा व्यक्तींनसोबत कुत्रा हा एक चांगला सहकारी बनू शकतो, असे देखील त्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हृदयविकार आणि स्ट्रोक होण्याची शक्यता घटते

अमेरिकने हार्ट असोसिएशनने या अहवालासाठी ३८ लाख लोकांच्या जीवनशैलींचा अभ्यास केला होता. या अभ्यासानुसार असे निष्पन्न झाले आहे की, ज्या व्यक्ती कुत्रा पाळतात त्या व्यक्तींना हार्ट अटॅक आणि स्ट्रोक होण्याची शक्यता २४ टक्क्यांपर्यंत घटते. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती कुत्रा पाळतात त्या एखाद्या समोरच्या व्यक्तीशी चांगल्या प्रकारे सामना करतात, असे देखील निदर्शनास आले आहे. तसेच कुत्र्यासोबत राहिल्याने त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने त्या व्यक्ती तणावमुक्त राहत असल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – झोमॅटो डिलिव्हरी बॉयने फरार केलेला ग्राहकाचा कुत्रा परतला


 

First Published on: October 15, 2019 4:55 PM
Exit mobile version