घरमहाराष्ट्रझोमॅटो डिलिव्हरी बॉयने फरार केलेला ग्राहकाचा कुत्रा परतला

झोमॅटो डिलिव्हरी बॉयने फरार केलेला ग्राहकाचा कुत्रा परतला

Subscribe

पुणेरी ग्राहक महिलेला दोन दिवसांच्या शोधानंतर तिचा ‘डोट्टू’ नावाचा पाळीव कुत्रा सुखरूप मिळाला

काही दिवसांपुर्वी पुण्यातील एका डिलिव्हरी बॅायने चक्क एका ग्राहकाचा पाळीव कुत्राच पळवून नेला असल्याची घटना कर्वे रोड येथे घडल्याचे उघड झाले होते. वंदना शाह असं ग्राहकाचं नाव असून त्यांनी ट्विट करतआपला संताप व्यक्त केला होता. सोमवारी दुपारच्या सुमारास वंदना शाह यांचा ‘डोट्टू’ नावाचा बिगल जातीचा कुत्रा बेपत्ता झाला होता. मात्र अखेर हा कुत्रा सुखरूप घरी परतला आहे.

दोन दिवसाच्या तपासानंतर कुत्रा सुखरूप मिळाला

झोमाटोच्या डिलिव्हरी बॉयने पुण्यातून एका ग्राहकांचा कुत्रा अपहरण करून फरार केल्याची चर्चा होती. मात्र या पुणेरी ग्राहक महिलेला दोन दिवसांच्या शोधानंतर तिचा ‘डोट्टू’ नावाचा पाळीव कुत्रा सुखरूप मिळाला आहे. अन्न वितरण मंचने असा दावा केला आहे की त्यांनी कसून तपासणी देखील केली आहे. हा पाळीव कुत्रा सुखरूप असून त्याला कोणतीही इजा झालेली नाही. दरम्यान, झोमॅटोवाल्यांनी असे सांगितले की, या कुत्र्याचे अपहरण करणारा आमच्या समुहातील व्यक्ती नसून या कुत्र्याचे अपहरण करणारा वेगळाच व्यक्ती होता.

- Advertisement -

असा होता बेपत्ता कुत्र्याचा शोध सुरू

डिलीव्हरी बॉयने कुत्रा पळवून घेऊन गेल्यानंतर शाह यांनी आजूबाजूच्या परिसरात कुत्र्याचा शोध घेतला असता त्यांना कुत्रा कुठेच आढळून आला नाही. अखेर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा निर्णय घेतला. सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता कुत्रा बेपत्ता होण्याच्या आधी शाहांच्या होम कम फॅक्टरी कॉम्प्लेक्सच्या परीसरात तो फिरताना आणि खेळताना दिसत होता. खूप वेळ शोधल्या नंतरही जेव्हा तो भेटला नाही तेव्हा चिंतित झालेल्या शाह यांनी आजूबाजूच्या परीसरात कुत्र्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण, डोट्टूचा काही पत्ता लागला नाही. तोपर्यंत त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेत आपला कुत्रा हरवला असल्याची कल्पना दिली. पोलिसांनीही त्याला शोधायचं आश्वासन दिलं. या दरम्यान, वंदना यांनी एका खानावळी जवळ उभ्या असलेल्या फूड डिलिव्हरी बॉइजकडे चौकशी केली असता, त्यातील एकाने डोट्टूला ओळखले आणि त्याला त्याच्या सहकाऱ्याने घेऊन गेल्याचे सांगितले.

- Advertisement -

डोट्टूचा एका माणसासोबतचा फोटो शाहांना मिळाला असून तो माणूस तुशार नावाचा एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय असल्याचे समजले.


हेही वाचा – ग्राहकाचा कुत्रा घेऊन झोमॅटो डिलिव्हरी बॉय फरार!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -