हॉटस्पॉट बनलेल्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारची असणार नजर

हॉटस्पॉट बनलेल्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारची असणार नजर

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४० हजारावर गेला आहे. तर १ हजार ३०० लोकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. त्यामुळे या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरता केंद्र सरकारने देशातील जिल्ह्यांमधील करोना बाधितांची संख्या आणि मागील २१ दिवसांमधील तेथील स्थिती हे निकष लावून हॉटस्पॉट तयार केले आहेत.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयने देशातील काही जिल्ह्यांचा हॉटस्पॉटमध्ये समावेश केला आहे. विशेष म्हणजे त्या जिल्ह्यात आता केंद्र सरकारची बारीक नजर असणार आहे. तसेच तैनात करण्यात आलेल्या पथकामध्ये राज्य आरोग्य विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव अधिकाऱ्यांना रिपोर्ट देणार आहेत. याव्यतिरिक्त, हे पथक कोरोना रूग्णांच्या उपचारासंदर्भात सूचना देतील. तसेच कोरोनाबाधित रुग्णालयांना भेटी देखील देणार आहेत.

या २० जिल्ह्यात तैनात करण्यात आले पथक

आरोग्य मंत्रालयाने सार्वजनिक आरोग्य पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. तर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी हे पथक राज्याच्या आरोग्य विभागास मदत करणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

२ मे रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे पथक अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि संबंधित जिल्ह्यातील सचिव यांना रिपोर्ट देणार आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य आरोग्य विभागास मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या पथकामध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), जवाहरलाल स्नातकोत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था, जेआयपीएमईआर, राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था (एनआयएचएफडब्ल्यू), नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) चे तज्ज्ञ यांचा सहभाग आहे.


हेही वाचा – मास्क लावलं नाही म्हणून केला विरोध; घरात घुसुन चाकू-तलवारीने हल्ला


 

First Published on: May 4, 2020 12:25 PM
Exit mobile version