संशोधकांचा दावा; महिलांपेक्षा पुरुषांच्या शरीरात सर्वाधिक तयार होतात Corona Antibodies

संशोधकांचा दावा; महिलांपेक्षा पुरुषांच्या शरीरात सर्वाधिक तयार होतात Corona Antibodies

जगभरात कोरोनाचं थैमान अद्याप कमी प्रमाणात सुरूच आहे. कोरोनाच्या विळख्यात संपूर्ण जग अडकलं असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातून कोरोना लसीच्या शोधात आहे. दरम्यान या जीवघेण्या कोरोनावर अनेक संशोधनं देखील केली जात आहे. अशातच एक संशोधन समोर आले आहे. पोर्तुगालमधील संशोधकांनी दावा केला आहे की, सरासरी पुरूष, महिलांच्या तुलनेत कोरोना व्हायरस अॅन्टीबॉडिज जास्त तयार करू शकतात. संशोधकांच्या मते, ९० टक्के रुग्णांमध्ये सार्स-कोव-२ व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर ७ महिन्यांनी अॅन्टीबॉडी आढळून आल्या आहेत. युरोपीय जर्नल ऑफ इम्युनोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनाच्या निष्कर्षांनुसार, अॅन्टीबॉडीच्या स्तराचा वयाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ६ महिन्यांमध्ये करण्यात आलेल्या संशोधनातून कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर ३ आठवड्यांतच अॅन्टीबॉडीच्या स्तरात वेगाने वाढ झाल्याचं पाहायला मिळाले. परंतु, त्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यामध्ये कमतरता झाल्याचंही दिसून आले आहे. संशोधकांनी सांगितले की, कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानंतरच्या सुरुवातीच्या टप्प्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरात जास्त अॅन्टीबॉडी तयार होतात. परंतु, काही महिन्यांनी महिला, पुरुष दोघांच्याही शरीरात अॅन्टीबॉडी स्तर समान पातळीवर दिसून येतो.’

संशोधकांनी कोविड-१९ रुग्णालयातील ३०० हून अधिक रुग्ण आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे अॅन्टीबॉडी स्तर आणि २०० हून अधिक कोरोना मधून बरे झालेल्या स्वयंसेवकांची निरिक्षणं नोंदवली होती. तर पोर्तुगालमध्ये मेडिसिना मॉलिक्यूलर आण्विक जोआओ लोब एंट्यून्स पासून मार्क वल्डोवेननुसार, ‘मानवी रोगप्रतिकारक शक्ती सार्स-कोव-२ ला हानिकारक व्हायरसच्या स्वरूपात ओळखतो. आणि त्यानंतर याचं उत्तर म्हणून अॅन्टीबॉडीचं उत्पादनही करतो. जे व्हायरसशी लढण्यासाठी फायदेशीर ठरते.’


देशात कोरोना बाधितांच्या संख्येत घट; बळींचा आकडाही ५०० च्या खाली

First Published on: October 26, 2020 11:04 AM
Exit mobile version