घरदेश-विदेशदेशात कोरोना बाधितांच्या संख्येत घट; बळींचा आकडाही ५०० च्या खाली

देशात कोरोना बाधितांच्या संख्येत घट; बळींचा आकडाही ५०० च्या खाली

Subscribe

देशात गेल्या २४ तासात ४५ हजार १४९ नव्या कोरोना रूग्णांची नोंद

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी कोरोना संदर्भात जाहीर केलेल्या आकडेवारीतून थोडा दिलासा मिळणार आहे, आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद ३ महिन्यांतील दैनंदिन रूग्ण संख्येच्या तुलनेत सर्वात कमी झाली आहे. इतकेच नव्हे तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही घट झाली आहे आणि दररोज होणाऱ्या कोरोनामुळे रुग्णांच्या मृत्यूची संख्या ५०० वर आली आहे. तर देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रूग्णांच्या संख्येतही सातत्याने घट होत आहे, यासह दिलासादायक बाब म्हणजे रिकव्हरी रेटमध्ये वाढ होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात गेल्या २४ तासात ४५ हजार १४९ नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली असून सध्या बाधितांचा आकडा ७९ लाख ९ हजारांवर पोहोचला आहे. तर दिवसभरात ४८० जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जीव गमावलेल्यांचा आकडा १ लाख १९ हजार १४ झाला आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असून सध्या ६ लाख ५३ हजार ७१७ रूग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहे.

- Advertisement -

दरम्यान, देशात आतापर्यंत एकूण ७१ लाख ३७ हजार २२९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिवसभरात ५९ हजारांहून अधिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  देशात कोरोनाबाधित रूग्ण निदर्शनात येण्यासाठी कोरोना चाचणी अद्याप सुरूच आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत एकूण १० कोटी ३४ लाख ६२ हजार ७७८ जणांचे नमुने तपासण्यात आले तर गेल्या २४ तासात ९ लाख ३९ हजार ३०९ कोरोना चाचण्या झाल्याची माहिती ICMR ने दिली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -