mRNA या कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा धोका, धक्कादायक अहवाल आला समोर

mRNA या कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा धोका, धक्कादायक अहवाल आला समोर

Covid-19: Five patients died in the state due to Corona; Including two from Mumbai

फ्लोरिडाचे सर्जन जनरल डॉ. जोसेफ ए. लाडापो यांनी mRNA COVID-19 लसीबद्दल एक धक्कादायक माहिती दिली आहे. या कोरोना लसीमुळे 18 ते 39 वयोगटातील पुरुषांसाठी, हृदयविकाराशी संबंधित मृत्यूचा धोका वाढतो, असे लाडापो म्हणाले. फ्लोरिडा आरोग्य विभागाने लस सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वयं-नियंत्रित केस मालिकेचे विश्लेषण केले. ज्यामध्ये असे दिसून आले आहे की, mRNA COVID-19 लसीकरणानंतर मृत्यू होण्याचा धोका वाढतो.

COVID-19 mRNA लसींवरील अहवाल जारी

लाडापो यांनी ट्वीट करत सांगितले की, आम्ही कोविड-19 mRNA लसींचे विश्लेषण जारी केले आहे. ज्याबद्दल जनतेने जागरुक असणे गरजेचे आहे. या विश्लेषणामुळे 18 ते 39 वयोगटातील पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यूचा धोका वाढल्याचे दिसून आले आहे. हा धोका पाहता आपण शांत बसू शकत नाही, असे ते म्हणाले.

84 टक्के वाढ

या विश्लेषणात असे दिसून आले की, mRNA लसीकरणानंतर 28 दिवसांच्या आत 18 ते 39 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यूच्या घटनांमध्ये 84 टक्के वाढ झाली आहे.

शल्यचिकित्सक जनरल डॉ. जोसेफ लाडापो म्हणाले की, लसींसह औषधांच्या सुरक्षितता आणि परिणामकारकतेचा अभ्यास हा सार्वजनिक आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. दरम्यान, भारतात पहिली mRNA Covid-19 लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा : Viral Video : ट्रेनच्या छतावरून प्रवाशांचा प्रवास; पण एकट्या वृद्ध व्यक्तीवरच सर्वांची


 

First Published on: October 8, 2022 12:42 PM
Exit mobile version