Heavy Rain : आंध्र प्रदेश, तेलंगणात पावसाचा हाहाकार; आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू

Heavy Rain : आंध्र प्रदेश, तेलंगणात पावसाचा हाहाकार; आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गेल्या २४ तासांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये मिळून आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे सर्वाधिका नुकसान हैदराबादमध्ये झाले असून येथील अनेक भागांमध्ये सततच्या पावसामुळे आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला असून त्यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली असून या कठिण परिस्थितीत केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातही पावसाने शिरकाव केला असून काही शहरांमध्ये जोरदार तडाखा दिला आहे. पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडला असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चार प्रमुख धरणांच्या परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक आहे. संततधार अशीच राहिल्यास खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सावधानता बाळगण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा –

भोसले राजघराण्याच्या ३७३ वर्ष जुना असलेला दुर्बीळ बुरुज ढासळला

First Published on: October 14, 2020 11:19 PM
Exit mobile version