Heavy snowfall : काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; महामार्ग बंद तर वैष्णोदेवी मंदिर दर्शन सेवेत अडथळे

Heavy snowfall : काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; महामार्ग बंद तर वैष्णोदेवी मंदिर दर्शन सेवेत अडथळे

Heavy snowfall : काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; महामार्ग बंद तर वैष्णोदेवी मंदिरतील सेवा विस्कळीत

काश्मीरमधील अनेक भागात जोरदार बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. यात श्रीनगरमध्ये शनिवारी सकाळपासून हिमवृष्टीचा जोर वाढला असून याचा विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जोरदार बर्फवृष्टी आणि कमी दृश्यमानतेमुळे आज अनेक विमान उड्डाण उशीराने होत आहेत. बर्फवृष्टीचा जोर इतका वाढल की, आजूबाजूला बर्फाचा जाड थर साचला आहे. यामुळे लोकांना ये- जा करण्यास अनेक अडचणी येत आहे. हवामानातील बदलामुळे झालेल्या तुफान बर्फवृष्टीचा पर्यटकही आनंद लुटत आहेत. अशाच हवामान खात्याने 7 ते 9 जानेवारी दरम्यान जोरदार हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

वैष्णोदेवी मंदिरातील अनेक सेवांमध्ये अडचणी

जम्मू काश्मीरच्या कटरामधील माता वैष्णो देवी मंदिरातील बर्फवृष्टीमुळे अनेक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देण्यात येणारी बॅटरी कार, हेलिकॉप्टर सेवा देखील विस्कळीत झाली आहे. या बर्फवृष्टीदरम्यान यात्रा सुरू राहणार आहे.

काश्मीर पर्यटकांनी गजबले

श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कमी दृश्यमानतेमुळे सलग दुसऱ्या दिवशी उड्डाणे उशीराने होत आहेत. या बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोरे पर्यटकांनी गजबजले आहे. यात सर्व हिल स्टेशन पर्यटकांनी फुलून गेले आहेत, परंतु अशा हवामानामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागतेय. मुगल रोड आणि झोजिला मार्ग खराब हवामानामुळे बंद करण्यात आले आहेत. महामार्गासह विविध ठिकाणी संततधार पाऊस आणि हिमवृष्टी आणि हिमवृष्टीमुळे उधमपूरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग तिसऱ्या दिवशीही वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

हवामान खात्याचा अंदाज

हवामान खात्याने 9 जानेवारीपर्यंत संपूर्ण काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे . 7 आणि 8 जानेवारीला काश्मीरमध्ये मुसळधार बर्फवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे विभागाने म्हटले आहे. ऑरेंज अलर्टसोबतच काश्मीर आणि लडाखमध्ये हिमस्खलन आणि भूस्खलनाचा इशाराही देण्यात आला आहे.


ST Workers Strike : स्वारगेट पाठोपाठ पंढरपूर आगारातून पहिली एसटी बाहेर; अनिल परबांच्या लॉबिंगला यश

First Published on: January 8, 2022 2:25 PM
Exit mobile version