जम्मू-काश्मिरमध्ये अतिवृष्टी; महाराष्ट्रातील ४० पर्यटक अडकले

जम्मू-काश्मिरमध्ये अतिवृष्टी; महाराष्ट्रातील ४० पर्यटक अडकले

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसापासून बर्फवृष्टी होत आहे. या बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये काही पर्यटक अडकले आहे. या पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील ४० पर्यटक अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील दहा पर्यटकांचा समावेश आहे. हे सर्व पर्यटक दिल्लीवरुन वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेले होते.

यवतमाळमधील १० पर्यटक अडकले

वैष्णोदेवीचे दर्शन करुन हे पर्यंत जम्मू-काश्मीरच्या पटनी टॉप भागामध्ये गेले होते. मात्र त्याठिकाणी अतिबर्फवृष्टी होऊ लागल्याने या भागातील रस्ते बंद झाले. त्यामुळे अनेक पर्यटक अडकून पडले. या पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील ४० जणांचा समावेश आहे. त्यामध्ये पर्यटक अमरावतीचे आहेत. पवन अराठे, विकास शेटे, मनीष अग्रवाल, प्रशांत शेटे, शेखर एनगंटीवार, शुभम गिरमकर, सागर सूर्यवंशी, रितेश निलावार, रवी ठाकूर अशी यवतमाळातील पर्यटकांची नावे आहेत. दरम्यानस स्थानिक प्रशासन आणि संरक्षण दलाची मदत पथक बर्फ हटविण्याचे काम करत असून लवकरच पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले जाईल असे प्रशासनाने सांगितले.

दोन पर्यटकांचा हिमस्खलनात मृत्यू 

जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यामध्ये मंगळवारी हिमस्खलनाची घटना घडली होती. हिमस्खलनाखाली येऊन दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. तर दोन जण बेपत्ता झाले होते. त्यानंतर बेपत्ता झालेल्या दोन जणांचा शोध घेत त्यांना वाचवण्यात आले होते. या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. मुहम्मद रफीक (२५ वर्ष) आणि सुमेरना (१२ वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.

हेही वाचा – 

जम्मू रोपवे अपघातात दोघांचा मृत्यू तर चौघे जखमी

First Published on: January 25, 2019 12:37 PM
Exit mobile version