घरटेक-वेकजम्मू रोपवे अपघातात दोघांचा मृत्यू तर चौघे जखमी

जम्मू रोपवे अपघातात दोघांचा मृत्यू तर चौघे जखमी

Subscribe

जम्मू येथे रोपवेची रेस्क्यू कार पलटल्यामुळे झालेल्या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश राज्यपालांनी दिले असून मृतांना ५ लाखाची मदत घोषीत केली आहे.

जम्मू जिल्ह्यातील रोपवे प्रकल्पात सेफ्टी तपासणीदरम्यान झालेल्या अपघातात दोन मजूरांचा मृत्यू झाला आहे. रविवारी ही घटना घटना घडली. रेस्क्यू कारचा तपास करतेवेळी तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असल्याचे वर्तवले जात आहे. या अपघातात ६ मजूर ५० फूट खाली कोसळले होते. यानंतर दोघांचा मृत्यू झाला तर चौघेजण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघाताबद्दल माहिती मिळताच राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यपालांनी जखमी झालेल्यांवर मोफत उपचाराचे आदेश दिले आहेत याचबरोबर दुर्घटनेत मृत पावलेल्या ५ लाखांचा निधी देण्याचे घोषित केले. या घटनेत बिहार येथील राकेश कुमार आणि पश्चिम बंगाल येथील हरि किशन या दोघांचा मृत्यू झाला.

मोदींच्या हस्ते होणार होते उदघाटन

हा रोप वे लोकांसाठी बनवण्यात आला आहे. ३ फेब्रूवारी रोजी याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केले जाणार आहे. या दुर्घटनेला काम करणारी कंपनी जवाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे दोघांना जीव गेला असल्याचा दावा केला गेला आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -