Heeraben Modi Demise : 100 वर्षांचे खडतर आयुष्य आणि 6 मुलांचा सांभाळ

Heeraben Modi Demise : 100 वर्षांचे खडतर आयुष्य आणि 6 मुलांचा सांभाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. मध्यरात्री 3.30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली म्हणून 28 डिसेंबर रोजी अहमदाबाद येथीलयू एन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र, गुरुवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हिराबेन मोदी यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे.

असं होतं हिराबेन मोदी यांचे आयुष्य
हिराबेन मोदी यांचा जन्म 18 जून 1923 साली मेहसाणामध्ये झाला होता. त्यांचे लग्न दामोदरदास मूलचंद मोदी यांच्याशी झाले होते. त्यावेळी त्यांचे पती आणि मोदींते वडील चहा विकायचे. हीराबेन आणि दामोदरदास यांना 6 मुलं होती. नरेंद्र मोदी त्यांचे तिसरे अपत्य आहे. हिराबेन आणि दामोदरदास यांची अमृत मोदी, पंकज मोदी, प्रह्लाद मोदी, सोमा मोदी आणि मुलगी वसंती बेन हंसमुखलाल मोदी ही आहेत.

हिराबेन मोदींनी त्यांच्या आयुष्यात आपल्या 6 मुलांचा सांभाळ करण्यासाठी अनेक संघर्ष केले. नरेंद्र मोदी अनेकदा आपल्या आईच्या संघर्षाबद्दल व्यक्त झाले आहेत. 2015 मध्ये फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्गसोबत चर्चा करताना नरेंद्र मोदींनी आपल्या आईच्या संघर्षाची आठवण सांगितली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, “माझ्या वडीलांच्या निधनानंतर आमचा सांभाळ करण्यासाठी आई दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन भांडी घासायची आणि पाणी भरायची.” तेव्हा ही आठवण सांगताना नरेंद्र मोदींना अश्रू अनावर झाले होते.

 

तसेच एकदा एकावृत्तवाहिनीच्या मुलाखतीत नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींनी देखील आईच्या संघर्षाबद्दल सांगितले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, “जेव्हा त्यांची आई(हिराबेन) 6 महिन्यांच्या होत्या तेव्हाच त्यांची आईचे निधन झाले होते. त्यावेळी त्यांच्या वडीलांनी दुसरे लग्न केले. तेव्हा त्यांना झालेल्या मुलांचा सांभाळ हिराबेन करायच्या. त्यानंतर काही दिवसांनी हिराबेन यांच्या सावत्र आईचे देखील निधन झाले. तेव्हा त्यांच्या वडीलांनी तिसरे लग्न केले. त्यांना झालेल्या मुलांचा सांभाळ देखील हिराबेन यांच्यावर होती. त्यानंतर त्यांचे लग्न झाले आणि आम्हा 6 मुलांचे देखील पालन पोषण केले. आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना केला पण तरीही त्यांना त्यांच्या आयुष्याकडून कोणतीच तक्रार नव्हती.”

 


हेही वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे निधन, १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

First Published on: December 30, 2022 9:11 AM
Exit mobile version