उत्तराखंडमध्ये पूरग्रस्त भागात मदतकार्य करणारे हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये पूरग्रस्त भागात मदतकार्य करणारे हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

हेलिकॉप्टर कोसळले

उत्तराखंडमधील पूरग्रस्त भागात मदत साहित्य घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले असून या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज, बुधवारी सकाळी उत्तरकाशीमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले. मोरीहून मोलदी या ठिकाणी हे हेलिकॉप्टर मदत साहित्य घेऊन जात होते. मुसळधार वृष्टीमुळे उत्तराखंडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे विविध भागात अडकलेल्या नागरीकांपर्यंत हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदत साहित्य पोहोचवले जात आहे.

घटनास्थळी बचावकार्य सुरू

या हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन लाल, सहपायलट शैलेश आणि स्थानिक व्यक्ती रमेश होते. या तिघांचाही मृत्यू झाला आहे, अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी देवेंद्र नेगी यांनी दिली आहे. उत्तराखंडमध्ये भूस्खलन आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. उत्तरकाशीत ढगफुटी झाल्याने हाहाकार उडाला आहे. येथे १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे बचावकार्य सुरू आहे. यामुळे या भागात मदत पोहोचवण्यासाठी हे हेलिकॉप्टर उत्तरकाशी जिल्ह्यातील मोरी येथून मोल्दी या ठिकाणाकडे चालले होते. मात्र वाटतेच ते कोसळून दुर्घटना घडली. घटनास्थळी आयटीबीपीचे जवान पोहोचले आहेत.

हेही वाचा – ‘पारले’मधील हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

First Published on: August 21, 2019 2:03 PM
Exit mobile version