भाजप नेत्यांवर हेमा मालिनी भडकल्या

भाजप नेत्यांवर हेमा मालिनी भडकल्या

प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यापासून भाजप नेत्यांकडून काँग्रेसवर टीका केली जात आहे. भाजप नेत्यांकडून प्रियंका गांधी यांच्यावर वादग्रस्त टीका होत आहे. प्रियंका गांधींवर भाजप नेत्यांकडून खालच्या पातळीवर होणाऱ्या या टीकेवर अभिनेत्री आणि भाजप नेत्या हेमा मालिनी भडकल्या आहेत. प्रियंका गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांना राजकारणात कोणतेच स्थान नाही, असे हेमा मालिनी म्हणाल्या आहेत.

भाजप नेत्यांची टीका सुरुच

भाजप नेत्यांची प्रियंका गांधीवरील टीका टीप्पणी सुरुच आहे. प्रियंका गांधी यांच्यावर विवादीत टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवर हेमा मालिनी भडकल्या जरी असल्या तरी भाजप नेतेमंडळेचे टीका करणे सुरु आहे. भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनीदेखील पुन्हा प्रियंका गांधींवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विजयवर्गीय म्हणाले की, ‘काँग्रेसकडे चेहरा नाही. त्यामुळे काँग्रेसकडून आता चॉकलेटी चेहरे समोर आणले जात आहेत. कधी सलमान खान काँग्रेसकडून निवडणूक लढविणार, अशी अफवा पसरवली जाते. कधी करीना कपूर निवडणूक लढविणार, अशी चर्चा रंगते. तर कधी प्रियंका गांधींना राजकारणात आणले जाते’.


दरम्यान, काँग्रेस सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस जाहीरनामा बनवत आहे. हा जाहिरनामा निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये जाहीर होणार आहे.

First Published on: January 31, 2019 1:13 PM
Exit mobile version