घरमनोरंजन#MeToo: मला हे धक्कादायक वाटत नाही; हेमा मालिनी

#MeToo: मला हे धक्कादायक वाटत नाही; हेमा मालिनी

Subscribe

अभिनेत्री हेमा मालिनी यांनी नुकतेच मीटू मोहिमेसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केले असून मला या घटनांच काहीच वाटच नाही, अस त्या म्हणाल्या. धक्कादायक म्हणजे त्यानंतर त्या हसत तिथून निघुन गेल्या.

अभिनेत्री हेमा मालिनी अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिली आहे. मुंबईत आयोजिक केलेल्या अभिनेता संजय खान यांच्या ऑकोबायोग्राफीच्या सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शवलेल्या हेमा मालिनी यांना देशात सुरु असलेल्या मीटू मोहिमेबाबत विचारले असता तिने थक्क करणारे वक्तव्य यावेळी केले. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत मला कोणतीही गोष्ट धक्कादायक वाटत नाही, असे यावेळी ड्रीम गर्ल हेमा मालिनी म्हणाल्या. आश्चर्याची बाब म्हणजे त्यानंतर त्या हसू लागल्या.

वाचा : #MeToo : सुहेल सेठ यांना मोठा दणका

- Advertisement -

नेकम काय म्हणाल्या हेमा मालिनी 

देशभरात सुरु असलेल्या मीटू मोहिमेंतर्गत सध्या विविध क्षेत्रातील महिला समोर येत असून आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडत आहेत. हेमा मालिनी यांनीही नेहमीच महिलांच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठवला आहे. त्यामुळे मीटूबाबत त्यांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांना या कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता. उत्तर देताना त्या म्हणाल्या, महिलांना स्वतःची रक्षा स्वतः करता यायला हवी. त्यांना दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. महिलांना स्वतःला ओळखता यायला हवे. तसेच त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या नकारात्मक गोष्टींचीही जाणीव होऊनही त्यापासून स्वतःचे रक्षण त्यांना करावे लागेल. दुसरं कोणीही तुमची मदत करणार नाही.

वाचा : राखी सावंत पैसे आणि सेक्सला हपापलेली – तनुश्री दत्ता

- Advertisement -

हसून निघून गेल्या हेमा मालिनी 

मीटू मोहिमेनंतर धक्कादायक घटना समोर आल्या आहोत. त्याबाबत तुम्हाला काय वाटत हे विचारल असता हेमा मालिनी म्हणाल्या, मला याबाबत काहिही वाटत नाही. हे सांगताना त्या हसल्या आणि तिथून निघून गेल्या. तनुश्री दत्ताने सुरु केलेल्या या मोहिमेत आतापर्यंत नाना पाटेकर, आलोकनाथ, चेतन भगत, साजिद खान, कैलाश खैर,अनु मलिक, विकास बहल सारख्या दिग्गजांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -