लॉकडाऊनमध्ये लोकांनी ‘हे’ पदार्थ केले सर्वाधिक सर्च

लॉकडाऊनमध्ये लोकांनी ‘हे’ पदार्थ केले सर्वाधिक सर्च

लॉकडाऊनमध्ये लोकांनी 'हे' पदार्थ केले सर्वाधिक सर्च

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांनाच आपापल्या घरी बंदिस्त व्हावे लागले. त्यामुळे वेळ कसा घालवायचा असा अनेकांना प्रश्न पडत आहे. त्यामुळे अनेक लोकांनी घरात बसून चमचमीत पदार्थ बनवण्यास सुरुवात केली. एरव्ही अनेकजण हॉटेलमधून मागवून खायचे. मात्र, तेही बंद असल्याने प्रत्येकांनी घरातील साहित्याचा वापर करुन वेगवेगळ्या रेसिपी घरीच ट्राय केल्या.

दरम्यान, बाहेर मिळणारे पदार्थ घरी कसे बनवायचे हे पाहण्यासाठी अनेकांनी इंटरनेटचा वापर करत गुगल सर्च केले. त्यामुळे भारतात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून गुगलवर सर्वाधिक रेसिपीज सर्च केल्या गेल्याचा अहवाल ‘गुगल’कडून जारी करण्यात आला आहे. त्याप्रमाणे ‘गुगल’ने सर्वाधिक सर्च केलेल्या पदार्थांची यादी जाहीर केली आहे.

गुगलने जाहीर केली यादी

सर्वाधिक सर्च केलेल्या रेसिपीजची गुगलने यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या यादीत पहिल्या क्रमांकावर ‘मोमो’ हा पदार्थ सर्वाधिक सर्च करण्यात आला आहे. कारण तरुणांमध्ये मोमो या पदार्थाची फार क्रेझ आहे. त्यामुळे तो पदार्थ कसा बनवायचा? याची रेसिपी इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केली गेली.

तर दुसऱ्या क्रमांकावर ‘ढोकळा’ हा गुजराती पदार्थ सर्च करण्यात आला आहे. कारण बरेच जण नाश्ताला या पदार्थाची निवड करतात.

तिसऱ्या क्रमांकावर सगळ्यांच्याच तोंडाला पाहातच क्षणी पाणी सुटणारी ‘पाणीपुरी’ हा पदार्थ आहे.

तर चौथ्या क्रमांकावर असा पदार्थ सर्च करण्यात आला आहे की, तो सहसा कोणी ट्राय करण्याचा प्रयत्न करत नाही. कारण हा पदार्थ बनवण्यासाठी फार मेहनत करावी लागते. त्याचप्रमाणे हा पदार्थ फार किचकट आहे. असा पदार्थ जो मिठाईच्या दुकानातून आणला जातो आणि त्याची चव चाखली जाते. असा मिठाईचा पदार्थ म्हणजे ‘जेलबी’

बऱ्याचदा गृहिणींचे म्हणे असते की, स्वयंपाक करण्यात मन रमून जाते आणि वेगवेगळ्या पदार्थांची चव देखील चाखता येते.


हेही वाचा – कोथिंबीरचे आरोग्यवर्धक फायदे


 

First Published on: May 13, 2020 2:04 PM
Exit mobile version