मधमाशीचे विष वेगाने नष्ट करतात धोकादायक कॅन्सर पेशी!

मधमाशीचे विष वेगाने नष्ट करतात धोकादायक कॅन्सर पेशी!

मधमाश्यांमध्ये आढळणारे विष स्तनाच्या कर्करोगाचा चांगला उपचार करू शकते. एका संशोधनात असे दिसून आले आहे की, मधमाशीचे विष स्तनाच्या कर्करोगाच्या धोकादायक पेशी कमी वेळात नष्ट करते आणि शरीराच्या इतर निरोगी पेशींचे कमी नुकसान करते. हॅरी पर्किन्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

संशोधकाने कर्करोगाच्या पेशींवर ३१२ मधमाशांच्या विषाचा अभ्यास केला. कर्करोगाच्या उपचारासाठी हे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. डॉ. सियारा डफीने ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये आढळणाऱ्या मधमाश्यांचा वापर ब्रेस्ट कॅन्सर पेशीवरील होणाऱ्या नकारात्मक अभ्यासांवर केला.

डेली मेलच्या अहवालानुसार डॉ. डफीच्या मते, विषाच्या विशिष्ट घटकामुळे कर्करोगाच्या पेशी पूर्णपणे नष्ट होतात. टॉक्सिनमध्ये आढळणारे मेलिटीन कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंधित करण्यासाठी देखील प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. डॉ. डफी म्हणतात की, याआधी कुणीही कर्करोगाच्या पेशींवर मधमाशी विषाची चाचणी घेतली नव्हती. मधमाशीच्या विषमध्ये आढळणारे मेलिटीन कृत्रिमरित्या देखील तयार केले जाऊ शकते. तसेच, सिंथेटिक मेलिटीनमध्ये अँटीकेन्सर गुण असल्याचे डॉ. डफी यांनी सांगितले. तर संशोधकाने म्हटले आहे की, मधमाशीचे विष कर्करोगाच्या पेशी फार वेगाने नष्ट करण्यास मदत करतात.

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाचे मुख्य वैज्ञानिक, प्रोफेसर पीटर क्लिनकेन म्हणाले की, हे संशोधन खूप दिलासादायक आहे. तर डॉ. डफी यांनी देखील विद्यमान केमोथेरपीद्वारे मेलिटीनचा वापर केला जाऊ शकतो की नाही याचीही तपासणी केली आहे. त्यालाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.


बापरे! महिलेच्या तोंडातून निघाला ४ फूटाचा साप!

First Published on: September 2, 2020 1:20 PM
Exit mobile version