खजुराहोमध्ये सूर्य तापला..रस्त्यांवर शुकशुकाट

खजुराहोमध्ये सूर्य तापला..रस्त्यांवर शुकशुकाट

शुक्रवारी मध्यप्रदेशातलं खजुराहो देशातलं सर्वात जास्त तापमानाचं शहर ठरलं. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी खजुराहोमध्ये ४७.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. जी तुलनेने इतर राज्यांपेक्षा खूप जास्त आहे. खजुराहो शहर हे खास करुन पर्यटनासाठी ओळखलं जातं. प्रचंड गरम तापमानाचा परिणाम तेथील पर्यटन व्यवसायावरही झाला आहे.

भर दुपारी रस्त्यावर शुकशुकाट
शुक्रवारच्या ४७.७ से. या तापमानामुळे सकाळपासूनच उन्हाच्या गरम वाफा
जाणवायला लागल्या. दुपारनंतर जस-जशी तापमानात वाढ झाली, तस-तसे उन्हाच्यावेळी बाहेर पडणे खूप कठीण झाले. दुपारच्या वेळी शहरातल्या रस्त्यांवर शुक-शुकाट पसरला होता.

चक्रीवादळाचा परिणाम

स्थानिक हवामान विभागाच्या मते, राज्याचे उत्तर-पश्चिम क्षेत्र पूर्व राजस्थान ते झारखंडपर्यंत पसरलेल्या एका चक्रीवादळाच्या प्रभावाखाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी 45 अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले आहे.

अजून काही दिवस चालणार उन्हाचा खेळ

हवामान खात्याने पुढील काही दिवसांत आणखी उष्ण वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. ग्वालियर, होशंगाबाद, खंडवा, खारगांव, छतरपुर, रायसेन, दमोह, रीवा, सतना, शिवपुरी, टिकमगढ आणि राज्यातील इतर भागात सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

First Published on: May 26, 2018 6:32 AM
Exit mobile version