Coronavirus : कोरोनाविरोधी लसीमुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती किती काळ टिकते? संशोधनातून मोठा खुलासा

Coronavirus : कोरोनाविरोधी लसीमुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती किती काळ टिकते? संशोधनातून मोठा खुलासा

गेल्या दोन वर्षापासून जगभरात कोरोनाचे सावट सुरु झाले. या कोरोनासारख्या भयानक महामारीवर मात करण्यासाठी जगभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. याच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लढा देण्यासाठी भारतात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र,सुमारे 30 टक्के म्हणजे दर 10 पैकी 3 लोकांमध्ये, कोरोना लसीचा प्रभाव फक्त 6 महिने टिकतो. यानंतर, त्यांच्याद्वारे तयार केलेली प्रतिकारशक्ती कमकुवत होते किंवा संपते. भारतात झालेल्या एका संशोधनातून हे तथ्य समोर आले आहे. हे संशोधन एआयजी हॉस्पिटल आणि एशियन हेल्थ केअर, हैदराबाद यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले आहे. हे संशोधन 1600 हून अधिक नागरिकांवर करण्यात आले. या सर्व नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

एआयजी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. नागेश्वरा रेड्डी म्हणाले की, लसीनंतर लोकांच्या प्रतिकारशक्तीवर काय परिणाम होतो हे जाणून घेणे हा या संशोधनाचा महत्त्वाचा उद्देश होता. यासोबतच कोणत्या वयोगटात बूस्टर डोसची जास्त गरज आहे हे शोधून काढले. त्यांनी सांगितले की संशोधनात लोकांची अँटीबॉडी पातळी तपासण्यात आली. कोरोना विरूद्ध प्रतिकारशक्तीची पातळी किमान 100 AU प्रति मिली असावी. यापेक्षा कमी असल्यास संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. रोग प्रतिकारशक्तीची पातळी किमान 100 AU प्रति मिली असावी.

डॉ. रेड्डी म्हणाले की, असे आढळून आले आहे की 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेली प्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे. असे सुमारे 6 टक्के होते, ज्यामध्ये रोग प्रतिकारशक्तीची पातळी किमान पातळीवर होती.भारतात कोरोना विरोधी लसीकरणाला वर्षपूर्ती झाली असून, आतापर्यंत 157 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र,देशातील एकूण एक नागरिकांना लसीचा डोस देण्याचे लक्ष्य आहे.


हेही वाचा – Maharashtra Corona Update : आज राज्यात 43 हजार 697 नवीन रुग्णांची नोंद ; मृत्यू दरात घट


 

First Published on: January 20, 2022 12:04 AM
Exit mobile version