General Election 2024 : मोदींना हरवण्याचा मास्टर प्लान काय?, राजकीय चाणक्याने केला उलगडा

General Election 2024 : मोदींना हरवण्याचा मास्टर प्लान काय?, राजकीय चाणक्याने केला उलगडा

राजकीय रणनितीकार ज्यांना राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जाते असे प्रशांत किशोर यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी भाजपला कशा पद्धतीने हरवता येईल, याबाबतचे भाष्य केले आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे. विरोधी पक्षाला त्यांनी काही टिप्स देतानाच कशा पद्धतीने मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारला हरवता येईल, याबाबतची स्ट्रॅटेजी सांगितली आहे. त्याचवेळी भाजपच्या मजबूत मुद्द्यांवर (नॅरेटिव्हवर) हरवण्याबाबतचे भाष्य त्यांनी केले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अपयशी ठरलेल्या नॅरेटिव्हवरही त्यांनी भाष्ट केले आहे. त्यामुळेच ममता बॅनर्जी यांना भाजपच्या बलाढ्या आव्हानाला कशा पद्धतीने मात देता आली, याबाबतचाही उलगडा मुलाखती दरम्यान केला. (How modi lead BJP government defeated in general election 2024 prashant kishore shared 3 formulas)

प्रशांत किशोर म्हणाले की, भाजपने हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि लोक कल्याणकारी योजनांचा एक मजबूत नॅरेटिव्ह तयार केले आहे. त्यामुळे जोवर या नॅरेटडिव्हला पराभूत करण्यासाठी काऊंटर नॅरेटिव्ह जोवर विरोधी पक्ष निर्माण करणार नाही, तोवर जिंकण सोप नाही. विरोधकांनी रणनिती आखतानाच भाजपला किमान दोन नॅरेटिव्हच्या मुद्द्यावर पराभूत करायला हवे. तरच भाजपला हरवणे शक्य आहे.

भाजपने आतापर्यंत हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि लोक कल्याण या तीन मुद्द्यांचा लाभ घेत सर्वसामान्यांमध्ये एक विशिष्ट परिस्थिती निर्माण केली आहे. भाजपची सध्याची लोकप्रियता ही केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर टिकून नाही. तर व्यापकता आणि लोकप्रियतेच्या मागे अन्य तत्वांचेही योगदान आहे. त्यामुळे इतर दोन मुद्द्यांवरच विरोधी पक्षांना लक्ष देण्याची गरज आहे.

अन्य दोन मुद्द्यांमध्ये पहिला मुद्दा हा राष्ट्रवाद आणि दुसरा मुद्दा लोक कल्याण आहे. घरगुती आणि वैयक्तिक पातळीवर जेव्हा आपण लोक कल्याण आणि राष्ट्रवाद तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्याला एकत्र ठेवतो, तेव्हा ही अतिशय वेगळी परिस्थिती होते. त्यामुळेच भाजपच्या या तीन नॅरेटिव्ह्जपैकी कोणत्याही दोन मुद्द्यांवर ठोस नॅरेटिव्हची गरज आहे. तेव्हाच भाजपविरोधात तुम्हाला ताकदीने लढता येते. अन्यथा विरोधक म्हणून तुम्हाला जिंकण्याची संधी फारच थोडी राहते.

पश्चिम बंगाल निवडणूकीत भाजपचे प्रदर्शन यासाठीच खराब राहिले कारण, त्यांचा राष्ट्रवादाचा मुद्दा त्याठिकाणी चालला नाही. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये स्थानिक उप क्षेत्रवाद म्हणजे बंगाली अस्मितेचा मुद्दा मांडला. बंगाली अस्मितेच्या मुद्द्याने काऊंटर केल्यानेच ममता बॅनर्जी यांना राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर जिंकणे शक्य झाले. जेव्हा लोकसभा निवडणुका असतात, तेव्हा राष्ट्रवादाचा मुद्दा अधिक व्यापक होतो. त्यामुळे अशा स्थितीत भाजपला या मुद्द्यावर जिंकण्याची संधी अधिक निर्माण होते.


 

First Published on: January 25, 2022 9:55 AM
Exit mobile version