पतीला पगार किती? महिलेने दाखल केला आरटीआय

पतीला पगार किती? महिलेने दाखल केला आरटीआय

1 एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार

नवी दिल्ली – तुमचा पगार किती असा प्रश्न विचारल्यावर प्रत्येकजण बुचकळ्यात पडतो. चारचौघात आपल्या पगाराची रक्कम सांगायला कोणालाच आवडत नाही. मात्र, आपल्या कुटुंबियांना, पती-पत्नीला आपला पगार माहित असतो. काही वेळा जोडीदाराकडून पगाराची खरी रक्कम लपवली जाते. आपल्या पतीला किंवा पत्नीला नेमका किती पगार आहे हे जोडीदाराला माहित नसतं. परंतु, जेव्हा अशी प्रकरणं घटस्फोटापर्यंत पोहोचतात तेव्हा पती किती कमवतो हे जाणून घेण्याकरता पत्नी आरटीआय म्हणजे माहिती अधिकाराअंतर्गत याचिका दाखल करू शकते. असाच प्रकार आता समोर आला आहे.

घटस्फोटानंतर पतीने पोटगी द्यावी याकरता त्याला किती पगार आहे हे जाणून घेण्याकरता एका महिलेने आरटीआय दाखल केला होता. त्यानुसार संबंधित महिलेला येत्या १५ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश आयकर विभागाला देण्यात आले आहेत.

दि फायनान्सशिअल एक्स्क्प्रेसच्या वृत्तानुसार, केंद्रीय सूचना आयोगाने आपल्या आदेशात म्हटलं आहे की, महिलेने केलेल्या आरटीआयनुसार तिच्या पतीला संपूर्ण करासहित किती पगार आहे हे पुढील पंधरा दिवसांत माहिती दिली जावी. सुरुवातीला पतीचा पगार सांगण्यास आयकर अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. परंतु, आरटीआय दाखल केल्यानंतर पतीच्या पगाराची माहिती पत्नीला देण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

First Published on: October 3, 2022 5:23 PM
Exit mobile version