असा करा ‘रक्षा बंधन’ साजरा

असा करा ‘रक्षा बंधन’ साजरा

प्रातिनिधिक फोटो

भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला मजबूत करणारा सण म्हणजे ‘रक्षा बंधन’ आज साजरा केला जात आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. वर्षातील एक दिवस बहिणी भावाला राखी बांधतात. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पंरपरेचे एक वेगळे महत्व आहे. दरवर्षी राखी बांधण्यासाठी बहिणींना शुभ मुहूर्ताची वाट बघावी लागते मात्र यावर्षी बहिणींना वाट बघावी लागणार नाही. अनेक वर्षांनंतर असा योग योतो. यावर्षी दिवसभर बहिणी आपल्या भावाला राखी बांधू शकतात. रक्षाबंधनच्या दिवशी बहिणी आपल्या लहान आणि मोठ्या भावांना राखी बांधून आपली सुरक्षा करण्याचे वचन घेतात. राखी बांधून बहिण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, असे केल्याने भाऊ बहिणीचे नाते अतूट होते. अंतिम श्वासापर्यंत भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करण्यास तत्पर असल्याचे वचन देतो.

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

राखी बांधण्यासाठी कोणतीही वेळ अशुभ नसते असे अनेकजणांची मान्यता आहे. मात्र भावाचे दिर्घायुष्य आणि आनंदासाठी मुहूर्तावर राखी बांधने आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज सकाळी ५.५९ ते सायंकाळी ५.२५ पर्यंत शुभमुहूर्त असल्याचे सांगण्यात येत आहे. सुर्यास्ताच्या वेळी राखी बांधल्याने भावाचे आयुष्य वाढते अशीही मान्यता आहे.

अशी तयार करा पूजेची थाळी

रक्षा बंधनच्या पवित्र दिवशी सकाळी लवकर उठून बहिणी तयारी करतात. पितळेच्या ताटात राखी, कुंकू, हळद, तांदूळ, मिठाई आणि दिवा अशी पूजेची थाळी तयार करतात. थाळी तयार केल्यानंतर पहिला बहिण आपल्या भावाच्या माथ्यावर टिळा लावते, मग भावाला ओवाळते, अक्षता टाकल्यानंतर बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते. राखी बांधल्यानंतर आपल्या हाथाने मिठाई खाऊ घालून बहिण भावाचे तोंड गोड करते.

पूजे पर्यंत उपाशी राहतात भाऊ – बहिण

हिंदू मान्यतेनुसार रक्षाबंधनच्या पूजेच्या आधी बहिण-भाऊ काही खात नाहीत. रक्षा बंधन उपाशी पोटीच करावी अशी समजूत आहे. असे केल्याने पूजा यशस्वी होते. पूजा झाल्यानंतर छोटी बहिण आपल्या भावाच्या पाया पडते. भाऊ बहिणीला आशिर्वाद देतो.

First Published on: August 26, 2018 11:50 AM
Exit mobile version