Lockdown Effect – पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या मानसिकतेवर होतोय परिणाम!

Lockdown Effect – पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या मानसिकतेवर होतोय परिणाम!

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. २०० हून अधिक देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सगळेच व्यवहार बंद आहेत. शाळा, कॉलेज, ऑफिसेस बंद आहेत. सध्या सगळे वर्क फ्रॉर्म होम करत आहेत. पण या सगळ्याचा म्हणजेच लॉकडाऊनचा मोठा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होणार आहे. कारण शाळा, क्लासेस बंद असल्यामुळे सध्या लहान मुलं घरीच आहेत. पण लॉकडाऊनमुळे, कोरोना व्हायरसमुळे मुलांना घरातून बाहेर खेळायलाही जात येत नाहीये. त्यामुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होणार आहे. अशावेळी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणं ही पालकांची जबाबदारी आहे.

यासाठी या पाच गोष्टींकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे

१.

मुलांची संवाद हा सगळ्यात मानसिक त्रासापासून मुलांना लांब ठेवण्याचा उत्तम पर्याय आहे. सध्या मुलांना शारीरीक स्पर्शाची जास्त गरज आहे. कारण ऐरवी ते आपल्या मित्र मैत्रीणीबरोबर खेळण्यात मग्न असतात. त्यामुळे त्यांना शारीरीक स्पर्शाची गरज नसते. पण आता लॉकडाऊनमध्ये त्यांना नक्की जवळ घ्या. त्यांच्यात मुलात मुल होऊ काहीवेळ घालवा.

२.

सध्याच्या परिस्थीतीत स्क्रीनवर जास्तवेळ राहू देऊ नका. त्यांच्या कंटाळा घालवण्यासाठी टिव्ही किंवा व्हीडिओ गेम हा पर्याय असू शकत नाही. त्याचबरोबर मुलांसमोर व्हीडिओ कॉलवर बोलताना मुलांवर लक्ष ठेवा की ते त्याचा चुकीचा वापर करणार नाहीत ना.

३.

सध्या अनेक क्लासेसे ने शाळांनी ऑनलाईन शिक्षणाला सुरूवात केली आहे. पण आजूनही मुलांना आणि शिक्षकांना त्याची नीटशी माहिती नाहीये. तेवढा अनुभव त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणात येणाऱ्या अडचणी सोडवायला मुलांना मदत करा.

४.

अनेक मुलांनी ऑनलाईन शिक्षणाला सुरूवात केली आहे. पण त्यांच्याकडे पुस्तकच नाहीयेत. त्यामुळे त्यांना विषय समजायला वेळ लागतो आणि ते अडचणीही विचारू शकत नाही. त्यामुळे तुम्ही या अडचणी लिहून घ्या आणि त्यांच्या शिक्षकांशी बोलून सोडवण्याचा प्रयत्न करा.

५.

मुलांना फेसबुक आणि व्हॉट्सअपची नाही तर भावनिक आधाराची. आपल्या मित्र मैत्रीणींना भेटता येत नाही म्हणून उदास होण्यापेक्षा त्यांना कोणत्याना कोणत्या कामात गुंतवून ठेवा. ज्या गोष्टीची मुलांना आवड असेल त्या गोष्टी मुलांना करू द्या. म ते कुकींग असेल किंवा स्केचिंग असेल किंवा व्हीडिओ बघून मुलांना काही करण्याची इच्छा असेल तर त्यांना करू द्या. त्यामुळे त्यांना जास्त मजा येईल.


हे ही वाचा – लॉकडाऊननंतरही १२ लाख आयटीकर्मचाऱ्यांना करावं लागणार ‘वर्क फ्रॉर्म होम’!


 

First Published on: April 28, 2020 9:06 AM
Exit mobile version