घरCORONA UPDATEलॉकडाऊननंतरही १२ लाख आयटीकर्मचाऱ्यांना करावं लागणार 'वर्क फ्रॉर्म होम'!

लॉकडाऊननंतरही १२ लाख आयटीकर्मचाऱ्यांना करावं लागणार ‘वर्क फ्रॉर्म होम’!

Subscribe

अनेक छोट्या उद्योगांना अनुभव आला आहे की, जे काम ऑफिसमधून होतं तेच काम घरून केल्यावरही होत आहे. त्यामुळे आता ऑफिसची काय गरज आहे?

सध्या देशावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन आहे. ३ मे पर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. देशातील कोरोनाची परिस्थीती बघता हा लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्याता आहे. सध्या सगळेच वर्क फ्रॉर्म होम करत आहेत. पण लॉकडाऊननंतर जनजीवन पुर्वस्थीतीवर आल्यानंतरही १० लाख आयटी कर्मचाऱ्यांना घरूनच काम करावे लागणार आहे.

आयटी उद्योगातील प्रसिद्ध व्यक्ती गोपालकृष्णन यांनी सोमवारी या बातमीला दुजोरा दिला. ते म्हणाले की, आयटीक्षेत्रात नोकरी जाण्याची शक्यता नाहीये पण नवीन भरती थांबू शकतात. पण त्यांनी आयटी क्षेत्रात वेतन कपात होण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतीय उद्योग परिसंघाचे माजी अध्यक्ष आयटी सेवा उद्योगात आता कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची तयारी करून घेतली आहे.

- Advertisement -

आयटी कंपनी इंफोसीस चे सह संस्थापक म्हणाले की, घरून काम करणे हे काही छोटं मोठं काम नाहीये. घरून काम करताना मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना टेक्नॉलॉजी पुरवावी लागली. गोपालकृष्णन म्हणाले की, मला आता सांगण्यात आलं की, आयटी क्षेत्रात ९० ते ९५ टक्के लोकं घरून काम करत आहेत. हा बदल खूप वेगाने घडले. त्यामुळे अशी भीती आहे की, कर्मचाऱ्यांना घरून काम करावं लागणार आहे.

ते पुढे म्हणाले की, अनेक छोट्या उद्योगांना अनुभव आला आहे की, जे काम ऑफिसमधून होतं तेच काम घरून केल्यावरही होत आहे. त्यामुळे आता ऑफिसची काय गरज आहे?  त्यामुळे आता आयटी कंपन्यांना भविष्यात विचार करावा लागेल की खरच त्यांना एवढ्या मोठ्या ऑफिसची गरज आहे का?

- Advertisement -

गोपालकृष्णन यांच म्हणणं आहे की, लॉकडाऊन संपल्यावर कमीत कमी २० ते ३० ट्कके आयटी कर्मचाऱ्यांना घरून काम करावे लागणार आहे. त्यामुळे साधाराण १२ लाख आयटी कर्मचाऱ्यांना लॉकडाऊननंतरही घरूनच काम करावं लागणार आहे.


हे ही वाचा – Coronavirus : रोजगार बुडाल्यास ‘ही’ सरकारी बँक देणार ५ हजार रुपये कर्ज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -