गुजरातमध्ये साजरी केला ‘टोमाटीना फेस्टिवल’

गुजरातमध्ये साजरी केला ‘टोमाटीना फेस्टिवल’

गुजरातमधील टोमाटीना फेस्टिवल

देशभरात होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केला जात असतानाच गुजरात येथे एक वेगळ्या पद्धतीची होळी बघायला मिळाली. आज रंगपंचमीच्या दिवशी रंगांचा वापर केला जात असताना गुजरातमध्ये टॉमेटोचा वापर करण्यात आला. गुजरात येथील अहमबाद येथे हा सण साजरा करण्याता आला. स्पेनमध्ये ज्या प्रकारे टोमाटीना फेस्टिवल साजरी केला जातो तशाच प्रकारे हा सण साजरा केला गेला. यावेळी अनेक तरुणी या ठिकाणी उपस्थित होते. या फेस्टिवलला तरुणांनी उत्साहाने उपस्थिती लावली. आगळी वेगळी होळी पाहून त्याकडे लोकही आकर्षित झाले. रंगपंचमीच्या दिनी अशा प्रकारची होळी अहमदाबमध्ये पहिल्यांदाच साजरी करण्यात आली असे लोकांनी सांगितले.


मोदींनी दिल्या शुभेच्छा 

होळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. “होळीच्या शुभ मुहूर्तावर नागरिकांना खूप शुभेच्छा. होळीला मोठ्या उत्साहाने रंग खेळा.”,असे पंतप्रधान म्हणाले.

First Published on: March 21, 2019 2:10 PM
Exit mobile version