Kabul Airport: अमेरिकन सी-१७ विमानाच्या चाकांवर आढळले मानवी अवयवाचे तुकडे

Kabul Airport: अमेरिकन सी-१७ विमानाच्या चाकांवर आढळले मानवी अवयवाचे तुकडे

अफगाणी नागरिकांना आता केवळ E-VISA वरच मिळणार भारतात प्रवेश, MHA चा निर्णय

अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होतेय. संपूर्ण अफगाणिस्तान तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याने नागरिकांची देश सोडण्यासाठी धडपड सुरु आहे. या राक्षसी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडणे फायद्याचे समजत हजारोंच्या संख्येने अफगाणी नागरिक काबुल विमानतळावर दाखल झालेत. व्हिसा, पासपोर्ट नसूनही नागरिक विमानतळाच्या दिशेने पळत आहेत. हे अफगाणी नागरिक जीवाची पर्वा न करता मिळेल त्या विमानाच्या छतावर चाकावर बसून प्रवास करतायतं. यामध्ये आत्तापर्यंत अनेक अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला. अशातच काबुल विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या अमेरिकेच्या सी-१७ विमानाच्या चाकांवर बसून प्रवास करणाऱ्या अफगाणी नागरिकांच्या मृतदेहाचे अवशेष आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. सोमवारी काबूलहून उड्डाण घेणारे हे विमान कतारमध्ये दाखल होताच हा दुर्दैवी प्रकार लक्षात आला. याप्रकरणी आता अमेरिकन हवाई दलाकडून तपास सुरु आहे.

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर अफगाणी नागरिक बिथरलेल्या मनस्थितीत आहेत. अफगाणिस्तानातून कसे बाहेर पडायचे असे प्रश्न या नागरिकांना सतावतोय. मात्र चहुबाजूंनी मार्ग बंद केल्यानं त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे हवाईमार्गे मिळेल त्या विमानात शिरण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु आहे. यावेळी विमानात शिरताना चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या. यात एका व्हायरल व्हिडियोमध्ये काही अफगाण नागरिक अमेरिकेच्या सी-१७ या विमानाला लटकत जीवघेणा प्रवास करत असल्याचे दिसून आले. त्याचवेळी काही अफगाण नागरिक विमानाच्या चाकांवर बसून प्रवास करत असल्याचा दावा करण्यात आला. याच नागरिकांचा चाकीखाली चिरडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

तालिबानविरोधात युद्धाची शक्यता, अमरुल्लाह सालेह अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती

अमेरिकन हवाई दलाच्या माहितीनुसार, अमेरिकन सी-१७ विमान काबूल विमानतळावर उतरताच शेकडो अफगाण नागरिकांनी विमानाला घेराव घातला. यामुळे एकूणच परिस्थिती भयावह झाली होती. त्यामुळे सी-१७ विमान चालक दलाने सुरक्षेच्या दृष्टीने विमानाचे उड्डाण लवकरात लवकर करण्याचा निर्णय घेतला.

मात्र अद्यापही बऱ्याच अफगान नागरिक तालिबानच्या जाचक अटींमध्ये आणि हिंसाचाराच्या वातावरणात राहण्यापेक्षा स्थलांतरण करण्यास सुरुवात केली. या स्थलंतराचे पडसाद आता जगभर उमटतायत. यामुळे कॅनडाने २० हजार अफगान निर्वासितांना आश्रय देण्याचे जाहीर केले आहे. मात्र अफगाण निर्वासितांचा प्रश्न आता जगासाठी गंभीर बनणार आहे. अफगाणिस्तानमधून आत्तापर्य़ंत ३२०० अमेरिकन नागरिकांचा सुखरुप सुटका झाली आहे. मात्र अजूनही काही अमेरिकन नागरिकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.


बिथरलेले चेहरे, जगण्याची आशा, अफगाणिस्तानातील भीषणता दाखवणारे विमानातील फोटो


 

First Published on: August 18, 2021 12:50 PM
Exit mobile version