घरताज्या घडामोडीतालिबानविरोधात युद्धाची शक्यता, अमरुल्लाह सालेह अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती

तालिबानविरोधात युद्धाची शक्यता, अमरुल्लाह सालेह अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती

Subscribe

मी कधीच तालिबान्यांसमोर झुकणार नाही. ज्यांनी माझे ऐकले अशा लाखो लोकांचा विश्वास मी तोडणार नाही.

तालिबान्यांनी (Taliban) अफगाणिस्तावर (Afganistan) ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये एकच भडका उडाला. अफगाणिस्तानमधील नागरिकांची जीव वाचवण्याची देश सोडून पळत आहेत. अफगाणिस्तामधून समोर आलेल्या अनेक व्हिडिओमधून तिथे असलेली सद्य परिस्थिती समोर येत आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह (Amrullah Saleh )यांनी स्वत:ला काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषित केले आहे. तसेच अफगाणिस्तमध्ये लोक देश सोडून पळत असताना सालेह यांनी तालिबानसमोर झुकण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तालिबानच्या मुद्द्यावर अमेरिकेशी चर्चा करणे व्यर्थ असून अफगाणिस्तानच्या नागरिकांनी तालिबान्यांसोबत असलेली लढाई स्वत: लढावी लागणार, असे म्हणत तालिबानविरोधात युद्धाची शक्यता वर्तवली आहे. (Amrullah Saleh declares himself President of Afghanistan caretaker)

 

- Advertisement -

यासंबंधी सालेह यांनी एक ट्विट केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, इथल्या नियमानुसार, देशाचे राष्ट्रपतींचा मृत्यू झाला किंवा ते देश सोडून पळून गेले तर उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती म्हणून घोषित करण्यात येते. मी सध्या देशाचा काळजीवाहू राष्ट्रपती आहे. सध्या मी देशाच्या सर्व मंत्र्यांना समर्थनासाठी आणि पाठिंब्यासाठी संपर्क करत. आता अफगाणिस्तानच्या नागरिकांना आपली लढाई आपणचं लढावी लागणार आहे. कोणालाही विरोध करण्यात काही उपयोग नाही या लढाईत सहभगी व्हा, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सालेह यांनी पुढे असे म्हटले आहे की, मी कधीच तालिबान्यांसमोर झुकणार नाही. ज्यांनी माझे ऐकले अशा लाखो लोकांचा विश्वास मी तोडणार नाही. तालिबान्यांसोबत मी कधीच राहणार नाही. सालेह याआधी देखील तालिबान्यांविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांनी यावेळी आपली ठाम भूमिका सर्वांसमोर मांडली आहे.


हेही वाचा – अफगाणिस्तानने वाढवली चिंता, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -