Human Rights Day 2021 : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस का साजरा होतो? काय आहे यंदाची थीम, आणि महत्त्व?

Human Rights Day 2021 : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस का साजरा होतो? काय आहे यंदाची थीम, आणि महत्त्व?

Human Rights Day 2021 : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस का साजरा होतो? काय आहे यंदाची थीम, आणि महत्त्व?

आज १० डिसेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा केला जातो. १९४८ मध्ये जेव्हा संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) मानवी हक्कांचे सार्वत्रिक घोषणा पत्र (UDHR) स्वीकारले त्या दिवसाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी १० डिसेंबर रोजी मानवाधिकार दिन पाळला जातो. हे घोषणा पत्र जगभरातल्या ५०० पेक्षा जास्त भाषांत अनुवादीत करण्यात आले आहे. या माध्यमातून जगभरातील नागरिकांच्या मानवी हक्क, अधिकाऱ्यांप्रती जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. १९५० सालापासून खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस साजरा होऊ लागलाय.

UDHR या घोषणा पत्रात म्हटले की ,मानवाधिकार हा जगभरातील प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. कोणत्याही जात, धर्म, पंथ, लिंग, राष्ट्र, प्रांत इत्यादींच्या आधारे कोणालाही मानवी अधिकार नाकारता येणार नाहीत असं संयुक्त राष्ट्रानं स्पष्ट केलं आहे. संयुक्त राष्ट्र महासभेचा हा जाहीरनामा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांचा पाया आहे. त्यामुळे जगातील प्रत्येक मनुष्याला स्वतंत्रता, समानता आणि सन्मानाचा हक्क आहे, असं मानवाधिकांरांच्या घोषणा पत्रात सांगितलं आहे.

मानवाधिकारांच्या घोषणा पत्रात त्यांनी म्हटले की, कोणत्याही मनुष्याला गुलामीत ठेवता येणार नाही, कोणासाही शारीरिक यातना देता येत नाही. कोणासोबतही निर्दयी, अमानवी आणि अपमानजनक व्यवहार करता येणार नाही. कारण जगातल्या प्रत्येकाला कायदेशीररित्या मानवी हक्काचा अधिकार आहे. या मानवी हक्कांमध्ये जगण्याचा अधिकार, अन्नाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आरोग्य सुविधांचा अधिकार यांचा समावेश आहे.

मुख्यत: स्त्रिया आणि बालकांच्या मानवी हक्काचं उल्लंघन युद्धकाळात किंवा संघर्षाच्या काळात प्रामुख्याने मानवी हक्कांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जाते. यात स्त्रिया आणि बालकांचा सर्वाधिक बळी जातो. यात जगभरातील अनेक अविकसित देशांममध्ये आणि यादवी राष्ट्रात मानवी हक्कांचं उल्लंघन मोठ्या प्रमाणात केले जाते. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा असतो.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसाची यंदाची थीम

यंदा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसानिमित्त ‘Reducing inequalities and Advancing human rights’ ही थीम आहे. याचा अर्थ स्त्री-पुरुष यांच्या असमानता कमी करणे आणि मानवी हक्क प्रगत करणे असा आहे. ही थीम UDHR च्या कलम 1 शी संबंधित आहे. ज्यात म्हटले आहे की ‘सर्व मानव मुक्त आहे. त्यांच्या सन्मान आणि अधिकारांमध्ये समानता आहे.’

“लोकांचे मानवी हक्क नाकारणे म्हणजे त्यांच्या मानवतेला आव्हान देणे होय.”

– दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला


माझ्या दादाकडे पाहिलं तर… महापौर किशोरी पेडणेकर यांना जीव मारण्याचे धमकीचे पत्र

First Published on: December 10, 2021 12:15 PM
Exit mobile version