घरमुंबईमाझ्या दादाकडे पाहिलं तर... महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याचे धमकीचे पत्र

माझ्या दादाकडे पाहिलं तर… महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याचे धमकीचे पत्र

Subscribe

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबतच्या वादानंतर महापौरांना धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात अश्लील भाषेचा वापर करत महापौर किशोरी पेडणेकर यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. या पत्राबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही९ वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.

धमकीच्या पत्रावर महापौरांची प्रतिक्रिया

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “इतर पत्र येतात त्यात हे पत्र होते. हे पत्र माझ्या जुन्या घराच्या पत्त्यावर आले. याच पत्ताही थोडा चुकलेला आहे. या पत्रात अतिशय अश्लील भाषेचा वापर करण्यात आला आहे. स्त्रियांच्या प्रत्येक अंगाचा उल्लेख आहे. घरच्यांना मारुन टाकू, मुलाला मारून टाकू.. उडवून टाकू अशी भाषा वापरली आहे. पत्रात आतमध्ये एकाचे नाव आहे आणि बाहेर वेगळं नाव आहे. आणि पोस्ट हे पनवेलचे आहे. पोलिसांत तक्रार दिली आहे. कारण अशी हिंम्मत जर कोण करत असेल तर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल… माझ्या पक्षाचा अजेंडा असतो…मी शिवसेना पक्षाची आहे… त्यामुळे धमकावून घरी बसवणे असं जर कोणाच्या मनात असेल तर होणारचं नाही पण दखल घेतली पाहिजे. कारण माथेफिरुंची संख्य़ा कमी नाही.”

- Advertisement -

“माझ्या दादाकडे पाहिल तर.”

यावर बोलताना महापौर पुढे म्हणाल्या की, “आशिष शेलार आणि हा वाद वेगळा आहे. कोणत्या तरी पक्षाचा हा माथेफिरु असावा पण माथेफिरुचं असावा. कारण पत्रात कोण अशी घाण भाषा वापरु शकत नाही… लिहू शकत नाही… ती लिहिली गेली. .कोणावरही संशय व्यक्त करु शकत नाही. पत्रात शिव्यांची लाखोली वाहिली आहे. स्त्रीच्या अंगाचे प्रदर्शन आहे. माझ्या दादाकडे बघितलं तर घरातल्यांना उडवून टाकेन, मुलाला मारुन टाकेन अशी भाषा वापरली आहे. कुटुंबाबद्दल लिहिल्याने मी थोडी धास्तावली. पोलीस सुरक्षा घेणार आहे.”

यापूर्वी देखील महापौर किशोरी पेडणेकर यांनी धमकीचा कॉल आला होता. दरम्यान पोलिसांकडून या पत्राचा तपास सुरु आहे.

- Advertisement -

शिवसेना आमदार मनिषा कायंदेंकडून महापौरांना आलेल्या पत्राचा तीव्र निषेध

“एक स्त्री राजकारणात उतरतेय तिने काम करुन नये तिच्या मनाचे खच्चीकरण व्हावे अशापद्धतीने हे पत्र लिहिले आहे. याचा तीव्र संपात आणि निषेध व्यक्त करतो. किशोरी पेडणेकर अशा पत्रांना भीक घालत नाहीत. पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यांनी जबाब नोंदवला आहे.” अशाप्रकारे शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी महापौरांना आलेल्या धमकीच्या पत्राचा तीव्र शब्दात निषेध केला.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -