म्हणून पतीने कापली पत्नीची जीभ

म्हणून पतीने कापली पत्नीची जीभ

पतीने कापली पत्नीची जीभ

उत्तर प्रदेशातील कानपुरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बायको सतत बोलत असल्यामुळे तिच्या बोलण्याला कंटाळल्यामुळे नवऱ्याने चक्क बायकोची बोलती बंद करुन टाकली आहे. बायको सतत बोलत असल्यामुळे रागावलेल्या नवऱ्याने तिची जीभ छाटली आहे. याप्रकरणी कानपुरच्या बर्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आकाश याला बर्रा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

उत्तरप्रदेश येथील कानपुरमधील बर्रा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील नवऱ्याने बायकोची जीभ कापल्याची घटना घडली आहे. आकाश आणि वंदना या दोघांचे १८ नोव्हेंबर रोजी लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर काही दिवसांनी त्यांच्यात हुंडा देण्यावरुन वाद सुरु झाला. तसेच हुंड्यासाठी पती सतत मारहाण करत असल्याचा आरोप पत्नीने केला आहे. दिवाळीच्या आधी पती आकाशने अक्षरश: कौर्याची परिसीमाच गाठली. आकाशने पत्नी वंदनाला गुंगीचे औषध देऊन तिची कात्रीने जीभ कापून टाकली. यामध्ये जखमी झालेल्या महिलेने शेजाऱ्यांची मदत घेऊन माहेरच्या मंडळींशी संपर्क साधला. वंदनाच्या माहेरीची माणस आल्यानंतर त्यांनी तिला रुग्णालयात घेऊन गेले. या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


वाचा – तेलंगणात कोसळले खासगी शिकाऊ विमान


उच्चशिक्षित कुटुंबातील प्रकार

या कुटुंबातील पती आकाश हा रुडकी आयआयटीमध्ये पीएचजी करत आहे. तर वंदनाचे वडिल रामकिशोर शंखवार हे पोलीस दलात मोठ्या उद्यावर आहेत. उच्चशिक्षित असून देखील त्यांच्या कुटुंबातील प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.


वाचा – सायको किलरने केली आणखी ९ मुलींची हत्या, दिली गुन्ह्याची कबुली

 

First Published on: November 21, 2018 4:00 PM
Exit mobile version