घरदेश-विदेशसायको किलरने केली आणखी ९ मुलींची हत्या, दिली गुन्ह्याची कबुली

सायको किलरने केली आणखी ९ मुलींची हत्या, दिली गुन्ह्याची कबुली

Subscribe

२०१६ रोजी सोहना रोड येथील ऑमेक्स मॉलच्या मागे एका अल्पवयीन मुलीचे शव मिळाले होते. तर २०१७मध्ये सिविल लाईन द्रोणाचार्य पार्क परीसरात आणखी एका अल्पवयीन मुलीचे शव मिळाले

उत्तरप्रदेशातील झासमधील मगरपुर गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपीच्या मुसक्या पोलिसांना आवळण्यात यश आले. पण पोलिसांनी केलेल्या अधिक तपासात गुरुग्राम, दिल्ली, ग्वालियर आणि झासी येथे अशाच प्रकारे झालेल्या ९ घटनांमध्ये देखील त्याचाच हात असल्याची कबुली त्याने दिली आहे. त्यामुळे या सगळ्या घटनांवरुन पडदा उठला असून हा आरोपी सिरिअल किलर असून त्याची मानसिक आरोग्य तपासण्यात येणार आहे. पण पोलीस तपासातील खुलास्यांमुळे पोलिसांनाही धक्काच बसला आहे.

psycho killer sunil
सायको किलर सुनील पोलिसांच्या ताब्यात

सीसीटीव्हीमुळे मिळाला आरोपी

मंगळवारी झासी पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पद व्यक्ती दिसला. त्याचे फोटोज काढून चौकशी सुरु केल्यानंतर त्याचे नाव सुनील (२०) असल्याचे कळले. पोलिसांनी त्याच्या कुटुंबाची चौकशी केली. आणि त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक ठिकाणी छापे मारले. एका भंडाऱ्यामध्ये सुनील असल्याची माहिती मिळाली आणि त्याने त्याला तातडीने अटक केली. त्यावेळी त्याने अन्य ठिकाणी झालेल्या घटनांची देखील कबुली दिली. त्याने गुरुग्राममध्ये ३, झासीमध्ये १ आणि दिल्लीत चार अल्पवयीन मुलींवर बलात्कार करुन त्यांची हत्या केली.

- Advertisement -
वाचा- शरीर संबंधांना नकार दिल्याने पत्नीचा खून

कुकर्मानंतर जायचा मंदिरात

आरोपीने चौकशी दरम्यान दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत मुलीवर अत्याचार करुन तिचा खून केल्यानंतर नवी दिल्लीतील कमला नेहरु पार्क मध्ये गेला. रात्रीचे जेवण त्याने गुरुद्वारामध्ये केले आणि सकाळच्या ट्रेनने तो दिल्लीत निघून गेला. दुसऱ्या दिवशी हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनच्या फ्लायओव्हर खाली राहिला. तिथून तो ट्रेनने झासीला गेला. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार भंडारामध्ये जेवण्यात सराईत आहे. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचताना गुरुग्रामध्ये मंगळवारी हनुमान मंदिर शनिवारी शनिमंदिर आणि बुधवारी साई मंदिरात भंडारा देखील ठेवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भंडाऱ्यात येणाऱ्या एकट्या मुलींवर त्याची नजर असायची आणि त्यांनाच तो लक्ष्य करायचा.

वाचा- मुंबईत ४ जणांनी केला कुत्र्यावर बलात्कार

दोन वर्षांनी झाला उलगडा

२०१६ रोजी सोहना रोड येथील ऑमेक्स मॉलच्या मागे एका अल्पवयीन मुलीचे शव मिळाले होते. तर २०१७मध्ये सिविल लाईन द्रोणाचार्य पार्क परीसरात आणखी एका अल्पवयीन मुलीचे शव मिळाले. त्याच पद्धतीने दिल्ली, झाशी, ग्वालिअर येथे घडलेल्या तब्बल ९ बलात्कार आणि हत्यांमागे त्याचा हात असल्याची कबुली त्याने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -