हैदराबाद प्रकरण : ९ डिसेंबरपर्यंत आरोपींचे मृतदेह सुरक्षित ठेवा; न्यायालयाचे आदेश

हैदराबाद प्रकरण : ९ डिसेंबरपर्यंत आरोपींचे मृतदेह सुरक्षित ठेवा; न्यायालयाचे आदेश

हैदराबाद प्रकरण : ९ डिसेंबरपर्यंत आरोपींचे मृतदेह सुरक्षित ठेवा

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील मुख्य चार आरोपींचा शुक्रवारी एन्काऊंटर करण्यात आला असून या एन्काऊंटरमध्ये चारही आरोपींना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगणा पोलिसांनी दिली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, ‘या चार आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले. दरम्यान, त्यांच्याकडून तपास सुरु असताना चारही आरोपींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र, तरीही ते पोलिसांच्या हातून निसटले आणि पळत सुटले, त्यामुळे त्यांना ठार करण्यात आले आहे’, अशी माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली होती. या घटनेचे काही स्तरातून स्वागत तर काही स्तरातून विरोध करण्यात आला होता. परंतु, आता याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या घटनेत ठार झालेल्या आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबर संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश तेलंगण उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, या घटनेविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यामध्ये न्यायिक हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयाने या आरोपींचे मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. शुक्रवारी पोलीस आणि आरोपींच्या झालेल्या चकमकीत हे चारही जण ठार झाले होते. यापूर्वी अटकेत असलेल्या या आरोपींना न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती. पोलीस कोठडीत असताना आरोपींकडून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले होते.

नेमके काय घडले?

आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत बंदूक खेचून घेतली आणि फायरिंग करण्यास सुरुवात केली. दरम्यान, एका आरोपींनी दगड आणि दांड्याने हल्ला चढवला. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी अखेर नाईलाजास्तव पोलिसांना त्यांच्यावर गोळीबार करावा लागला आणि त्यात चारही आरोपींचा मृत्यू झाला,’ अशी माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिली आहे.

आरोपींनी पोलिसांवर चढवला हल्ला

हैदराबाद येथे झालेल्या घटनेनंतर आरोपींचा शोध घेण्यात आला. खूप तपास केल्यानंतर आरोपींना ३० तारखेला अटक करण्यात आली. त्यानंतर आम्हाला ४ तारखेला आरोपींची कस्टडी मिळाली. यावेळी आम्ही गुन्हा कसा केला याची आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी पीडितीचा मोबाईल लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना घटनास्थळी घेऊन गेल्यानंतर आरोपींनी पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. याचे प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर हल्ला चढवावा लागला आणि यात त्या चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती व्ही. सी. सज्जनार यांनी दिली आहे.


हेही वाचा – हैदराबाद बलात्कार प्रकरण : असा झाला एन्काऊंटर


 

First Published on: December 7, 2019 12:06 PM
Exit mobile version