पुलवामा हल्ल्याचा पाकिस्तानी पत्रकारांनी केला निषेध

पुलवामा हल्ल्याचा पाकिस्तानी पत्रकारांनी केला निषेध

पाकिस्तानी महिला पत्रकार

भारतील पुलवामा येथील जवानांना देशभरात श्रद्धांजली दिली जात आहे. या हल्ल्यामधून पाकिस्तानने काढता पाय घेतला आहे. मात्र पाकिस्तानमधील तरुणांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. पाकिस्तानमधील तरुण महिला पत्रकारांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा निषेध एका कागदावर लिहून त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. “मी एका पाकिस्तानी आहे. मी पुलवामा येथील शहिदांना श्रंद्धाजली वाहते.” असा संदेश देतांना या मुली दिसत आहेत. हे फोटो ‘अमन की आशा या फेसबुक पेजने शेअर केले आहेत. “भारतावर झालेल्या हल्ल्यामुळे आम्ही अस्वस्थ आहोत. हल्ल्यात अनेक निरपराध लोक मारले गेले याचे आम्हाला दुःख आहे. अशा हल्ला करणाऱ्या संघटनांचा आम्ही विरोध करतो. ज्या पाकिस्तानी नागरिकांना हे चुकीचे वाटत आहे त्यांनी आमच्या सोबत या.” असा संदेश देण्यात आला आहे.

 

पाकिस्तानचा काढता पाय

पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेने भारतावर हल्ला केल्यानंतर हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका नसल्याचे सांगितले आहे. “पाकिस्तान स्वःता दहशतवादाचा शिकार झाला आहे. भारताने जर पाकिस्तानावर हल्ला केला तर पाकिस्तानही गप्प बसणार नाही.” अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली.

 

First Published on: February 21, 2019 2:03 PM
Exit mobile version