पंतप्रधानपदाची आकांक्षा नाही – गडकरी

पंतप्रधानपदाची आकांक्षा नाही – गडकरी

मला पंतप्रधान बनण्याची आकांक्षा नाही. मी आहे त्या पदावर खुश आहे. २०१९ साली नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. त्यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभा २०१९च्या निवडणुका लढवल्या जातील अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. २०१९च्या लोकसभा निवडणुका नितीन गडकरींच्या नेतत्वामध्ये लढाव्यात अशी मागणी केली जात होती. पण, या साऱ्या चर्चांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्णविराम दिला आहे. पाच राज्यांमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर मोदींची जादू ओसरली. मोदींना पर्याय शोधा अशी मागणी पुढे येऊ लागली. सोशल मीडियावर देखील त्याबद्दल चर्चा रंगली. पण, साऱ्या गोष्टींवर नितीन गडकरी यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी २०१९ साली पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

वाचा – २०१९ची जबाबदारी नितीन गडकरींकडे द्या – तिवारी

चर्चा फक्त गडकरींच्याच नावाची

पाच राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर ‘राजतिलक की करो तैयारी आ रहे है नितीन गडकरी’ असा मेसेज सर्वत्र फिरू लागला. शिवाय, योगी आदित्यनाथा यांच्या नावाची चर्चा देखील पंतप्रधानपदाच्या पदासाठी रंगली. २०१९च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी नितीन गडकरींच्या हाती नेतृत्व द्यावं अशी मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. एका जाहिर पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं २०१९ साली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हाती नेतृत्व सोपवावं असं किशोर तिवारी लिहिलेल्या पत्रामध्ये यांनी म्हटलं आहे. केशव तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांना हे पत्र लिहिलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेला भाजपचा पराभव हा काही अहंकारी नेत्यांचा पराभव आहे. त्यांनी नोटाबंदी लादली, जीएसटी लागू केली, इंधनाच्या दरात वाढ झाली. या अहंकारी नेत्यांबद्दल सध्या पक्षात आणि बाहेर देखील असंतोष आहे. त्यामुळे गडकरींकडे २०१९ची धुरा द्यावी अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.

वाचा – नितीन गडकरी पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये?

First Published on: December 21, 2018 9:10 AM
Exit mobile version