हल्क होगन कुस्तीतून निवृत्ती घेणार नाहीत

हल्क होगन कुस्तीतून निवृत्ती घेणार नाहीत

वेसलर हल्क होगन

‘डब्ल्यू डब्ल्यू ई’ किंवा ‘डब्लू डब्ल्यू एफ’ मधले जूने रेसलर आणि सुपरस्टार हल्क होगन हे निवृत्ती घेणार कुस्तीतून निवृत्त होणार नसल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली. तिन वर्षानंतरच्या बंदी नंतर हल्क होगन पुन्हा कुस्तीच्या रिंगमध्ये दिसणार आहेत. हल्क सध्या ६५ वर्षाचे आहेत. मात्र अजूनही त्यांना कुस्ती खेळण्याची आवड आहे. होगन यांनी २ नोव्हेंबर रोजी सोदी अरबमध्ये आयोजित डब्ल्यू डब्ल्यू ई च्या कार्यक्रमात ही घोषणा केली. ‘डब्ल्यू डब्ल्यू ई’ च्या ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये होगन येत्या काळात दिसतील. डब्ल्यू डब्ल्यू ई मधले ते सर्वात जूने रेसलर आहेत. आपल्या सुरुवातीच्या काळात त्यांना लोकांनी खूप प्रतिसाद दिला होता. खेळण्यास बंदी आणल्यामुळे होगन आता निवृत्ती घेत असल्याचे बातम्या आल्या होत्या. मात्र या बातम्या खोट्या असल्याची माहिती त्यांचा मुलगा निक होगन याने दिली आहे.

काय म्हणाला निक

“मला वाटत नाही माझे वडिल कधी निवृत्ती घेतील… सर्वांना हे गमतीशीर वाटेल मात्र ते अजूनही ६’५ उंच आणि ३०० पाऊंड वजनाचे आहेत. ते फक्त राक्षस आहेत. ते परत येण्यासाठी उत्सुक आणि खंबीर आहेत. कुस्ती हा त्यांच्या आवडीचा विषय नेहेमीच राहिला आहे. म्हणून ते आता पुन्हा रिंगमध्ये येणार आहेत.”- निक होगन

First Published on: November 27, 2018 8:35 AM
Exit mobile version