IAS टॉपर आता लोकसभेच्या आखाड्यात

IAS टॉपर आता लोकसभेच्या आखाड्यात

सिस्टम को सुधारणा है, देश की सेवा करणी है म्हणत आजा अनेक जण स्पर्धा परिक्षेमध्ये उतरतात. अनेकांनी तर आव्हानांचा सामना देखील केला आहे. असाच एक IAS अधिकारी म्हणजे शाह फैजल. शाह फैजल हे पहिले काश्मीरी आयएएस अधिकारी आहेत ज्यांनी देशात पहिला येण्याचा मान मिळवला. मात्र शाह फैजल यांनी आता नोकरीचा राजीनामा दिला असून लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. एखाद्या चित्रपटाला शोभावी अशीच ही सारी घडामोड आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शाह फैजल मैदानात उतरतील. २००९ साली देशात पहिले आल्यानंतर शाह फैजल काश्मीरमधील तरूणांसाठी आदर्श ठरले. पण, त्यांनी आता राजकारणात उतरण्याचं कारण फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे. काश्मीर खोऱ्यात लोक सातत्यानं मरत आहेत. सरकार मात्र काहीच करत नाहीत. अशा शब्दात शाह फैजल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


ओमर अब्दुलांकडून स्वागत

दरम्यान, शाह फैजल यांच्या निर्णयाचं स्वागत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी देखील केले आहे.


दुसरीकडे माजी केंद्रीय अर्थमंत्री यांनी शाह फैजल यांच्या निर्णयाचं स्वागत केलं असून सरकारवर मात्र टिकास्त्र डागलं आहे.

First Published on: January 10, 2019 1:48 PM
Exit mobile version