ICSI CS Result 2021: सीएस प्रोफेशनल परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा ऑनलाईन रिझल्ट

ICSI CS Result 2021: सीएस प्रोफेशनल परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा ऑनलाईन रिझल्ट

ICSI CS Result 2021: सीएस प्रोफेशनल परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा ऑनलाईन रिझल्ट

ICSI CS Result june 2021: सीएसकडून जून २०२१ सत्राच्या (Institute of Company Secretaries of India) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल एक्झिक्युटिव्ह परीक्षांचे निकाल आज १३ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. तिन्ही अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल उमेदवार ICSI च्या अधिकृत icsi.edu किंवा icsi.examresults.net वेबसाईटवर पाहू शकणार आहेत. यातील सीएस प्रोफेशनल परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर झाला असून सीएस एक्झिक्युटिव्ह परीक्षा २०२१ चा निकाल आज दुपारी २ वाजता जाहीर होणार आहे. तर फाउंडेशन कोर्सचा निकाल दुपारी ४ वाजता जाहीर होणार आहे.

एक्झिक्युटिव्ह आणि फाउंडेशन कोर्सचे ई-रिझल्ट वेबसाईटवर लगेच अपलोड होणार आहे. मात्र प्रोफेशनल कोर्सचा रिझल्ट उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवला जाईल. यातील व्यावसायिक आणि एक्झिक्युटिव्ह परीक्षा सीएस १० ते २० ऑगस्ट २०२१ दरम्यान घेण्यात आली होती. तर फाऊंडेशनची परीक्षा १३, १४ ऑगस्ट आणि ११, १२ सप्टेंबर रोजी घेण्यात आली होती.

ICSI CS Result 2021 : असा पाहा ऑनलाईन निकाल

१) उमेदवाराने सर्व प्रथम www.icsi.edu वर जा.

२) होम पेजवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

३) आता Roll Number आणि इतर माहिती भरा.

४) Submit वप क्लिक करा आणि तुमचा निकाल पाहा.

५) निकाल डाऊलनोड करुन प्रिंट आऊट घ्या.

प्रोफेशनल एक्झिक्युटिव्ह आणि फाउंडेशन परीक्षांच्या निकालाच्या प्रती ICSIकडून ऑनलाइन घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याची हार्ड कॉपी दिली जाणार नाही. मात्र नव्या आणि जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रोफेशनल प्रोग्रॅमचे निकाल मात्र फिजिकल कॉपीच्या स्वरूपात दिले जातील. जर निकालाची प्रत मिळाली नाही तर exam@icsi.edu वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आता एक्झिक्युटीव्हआणि प्रोफेशनल कोर्समध्ये नव्या,जुन्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा डिसेंबर २१ ते ३० मध्ये होणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन होईल. १४ ऑक्टोबरपासून त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.


 

First Published on: October 13, 2021 1:43 PM
Exit mobile version