बँकेच्या मॅनेजरनेच लावला ग्राहकांना चुना, आयडीबीआय बँकेतून पैसे गायब

बँकेच्या मॅनेजरनेच लावला ग्राहकांना चुना, आयडीबीआय बँकेतून पैसे गायब

घरात पैशांची बचत करायचं म्हटलं तर पैसे हातात राहत नाहीत आणि बँकेत ठेवायचे म्हटले तर पैसे कुठल्याही क्षणी गायब होतात. असाच एक धक्कादायक प्रकार सरकारी बँकेतून उघडकीस आला आहे. यावेळी बँकेच्या मॅनेजरनेच ग्राहकांना चुना लावला. आयडीबीआय बँकेतून पैसे गायब झाल्यामुळे ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

३४ वर्षीय रिलेशनशिप मॅनेजरने अनेकांच्या खात्यातून गुपचूप पैसे काढले आणि तब्बाल ४. ९२ कोटींचा घपला केला. मॅनेजरची पोस्टिंग आयडीबीआय बँकेच्या मिशन रोडवरील ब्रँचमध्ये होती. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता तिच्याकडून २३ लाख रुपयांचे एलआयसी बाँड आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेला कॉम्प्युटर जप्त करण्यात आला आहे.

आरोपीचे नाव साजिला आहे. तर आरोपीने २३ डिसेंबरला ४.९२ कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. तसेच हा सर्व पैसा एलआयसी बाँडमध्ये गुंतवला होता. आयडीबीआय बँकेचे उप शाखाप्रमुख संगमेश्वर यांना या प्रकरणाचा सुगावा लागताच त्यांनी याची सम्पंगीरामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली असता यामगे बँक मॅनेजरच असल्याचे उघडकीस आले.

साजिलाने बंगळुरूच्या गांधीनगर ब्राँचमध्ये काम करताना कथितरित्या ग्राहकांच्या खात्यातून २.९० कोटी रुपये गडप केले. त्यानंतर तिने एलआयसी बाँडमध्ये पैसे गुंतवले होते.


हेही वाचा : अदानी ग्रुपविरोधातील हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर स्टेट बँक ॲक्शन मोडमध्ये


 

First Published on: January 30, 2023 3:14 PM
Exit mobile version