‘जे प्रदेश कोरोनावर २० एप्रिलपर्यंत आळा घालतील तेथील नियम शिथिल’

‘जे प्रदेश कोरोनावर २० एप्रिलपर्यंत आळा घालतील तेथील नियम शिथिल’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा देशवासियांना संबोधित केले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये, याकरता लॉकडाऊन येत्या ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, या लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी लॉकडाऊन शिथिल केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

दरम्यान, या लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक राज्यावर बारकाईने लक्ष दिले जाणार आहे. त्यामुळे जे जिल्हे २० एप्रिलपर्यंत कोरोनाला आळा घालतील तेथील नियम शिथिल करण्यात येतील, असा विश्वास देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे आता प्रत्येकाची जबाबदारी असणार आहे की, आपल्या राज्यात कोरोनाचा प्रसार कमी झाला पाहिजे.

महाराष्ट्रात सर्वात अधिक कोरोनाबाधित

देशात कोरोनाने कहर केला असून याचा सर्वात अधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक कडक नियम करण्यात आले आहेत. मात्र, जर महाराष्ट्राला हे नियम शिथिल करायचे असल्यास त्यांनी कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासोबतच कोरोनाचा सामना करण्यात ते यशस्वी झाले तर राज्यातील नियम शिथिल होण्यास मदत होईल.


हेही वाचा – कुणालाही नोकरीवरून काढू नका; वाचा मोदींनी सांगितलेल्या ७ सूचना


 

First Published on: April 14, 2020 12:45 PM
Exit mobile version