‘२०१९मध्ये भाजप जिंकल्यास भारत ‘हिंदु’ पाकिस्तान होईल’

‘२०१९मध्ये भाजप जिंकल्यास भारत ‘हिंदु’ पाकिस्तान होईल’

काँग्रेस नेते शशी थरूर यांची भाजपवर जहरी टीका

२०१९च्या लोकसभा निवडणुका भाजपने जिंकल्यास भारत ‘हिंदु’ पाकिस्तान होईल अशा शब्दात काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे. शशी थरूर यांच्या विधानावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे. थरूर यांचे विधान हिंदुंचा अपमान करणारे असून त्यांनी भारताची लाज काढली आहे असे भाजपने म्हटले आहे. तिरूवनंतपुरम येथे बोलत असताना शशी थरूर यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे. दरम्यान, शशी थरूर यांच्या विधानावरून आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने भाजप – काँग्रेसने आता परस्परविरोधात टीका करताना दिसत आहेत.

काय म्हणाले शशी शरूर

२०१९च्या निवडणुका जिंकल्यास भारत ‘हिंदु’ पाकिस्तान होईल अशी जहरी टीका शशी थरूर यांनी भाजपवर केली आहे. शिवाय, भारतीय जनता पार्टी लोकसभा २०१९च्या निवडणुका जिंकल्यास नवीन संविधान लिहिले जाईल. ज्यामुळे देश पाकिस्तान बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल. त्यावेळी अल्पसंख्याकांना कोणताही सन्मान नसेल. २०१९च्या लोकसभा भाजपने जिंकल्यास लोकशाहीला धोका आहे. तयार होणारे नवीन राष्ट्र हे हिंदु सिद्धांतावर असेल. परिणामी अल्पसंख्यांकांमधील समानता नष्ट होईल. हेच दिवस पाहण्यासाठी पंडित नेहरू, महात्मा गांधी, मौलाना आझादांसह इतर महान नेत्यांनी संघर्ष केला होता का? असा सवाल देखील शशी थरूर यांनी केला आहे. काँग्रेसचे नेते शशी शरूर यांनी केलेल्या जहरी टिकेवरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवाय, भाजपने आता राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

First Published on: July 12, 2018 12:55 PM
Exit mobile version