रशियाकडून शस्त्रे घ्याल तर निर्बंध लादू, अमेरिकेची भारताला दमबाजी

रशियाकडून शस्त्रे घ्याल तर निर्बंध लादू, अमेरिकेची भारताला दमबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाच्या दौऱ्यावर निघाले असताना रशियाकडून शस्त्रखरेदी न करण्याबाबत अमेरिकेने इशारा दिला आहे. रशियाकडून शस्त्रे घ्याल तर निर्बंध लागू होऊ शकतील, अशी दमबाजीच अमेरिकेने भारताला केली आहे. रशियाकडून पाच एस-४०० ट्रायम्फ एअर डिफेन्स सिस्टिम खरेदी करण्याचा विचार भारत करत आहे. ही खरेदी झाली तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये संमत केलेल्या एका कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. हा कायदा जानेवारी महिन्यापासून अंमलात आला आहे.

काऊंटरिंग अमेरिकाज अ‍ॅडव्हर्सरीज थ्रू सँक्शन अ‍ॅक्ट हा कायदा गांभीर्याने घ्यायला हवा. अमेरिकेची व्यवस्था अमेरिकी कायद्याला श्रेष्ठ मानते. भारतच नाही तर रशियाकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रखरेदी करू इच्छिणाऱ्या सर्व सहकारी देशांना याचा गांभीर्याने विचार करावा लागेल, असे अमेरिकेच्या अधिकारी टीना कैदानोव्ह यांनी सांगितले.
कैदानोव्ह या पुढील आठवड्यात भारतात येत आहेत. या भेटीत त्या संरक्षण, व्यापार इत्यादी मुद्यांवर चर्चा करणार आहेत. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्यात बैठक होणार आहे.

First Published on: May 22, 2018 8:20 AM
Exit mobile version