इराणला जर युद्धच हवे असेल तर हा त्यांचा शेवट असेल – ट्रम्प

इराणला जर युद्धच हवे असेल तर हा त्यांचा शेवट असेल – ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टनच्या हितसंबंधाच्या जर आड आलात तर इराणला उध्वस्त करू, असा गंभीर इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. “जर इराणला युद्ध हवे असेल तर इराणचा हा अधिकृत शेवट असेल. पुन्हा अमेरिकेला धमकावण्याचा प्रयत्न करू नका.” असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. इराणच्या रिव्हॉल्यूशनरी गार्डसचे कमांडर हुसैन सलामी यांनी रविवारी दिलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही धमकी दिली आहे. सलामी म्हणाले की, “इराण अमेरिकासारखा युद्धाला घाबरत नाही.”

इराणच्या सैन्य कार्यक्रमाचे इराणी टीव्ही चॅनेलवर प्रसारण करण्यात आले. या कार्यक्रमाला सलामी उपस्थित होते. याच दरम्यान केलेल्या भाषणात ते म्हणाले की, “तहरीनला युद्ध नको आहे, मात्र आम्ही युद्धाला घाबरत नाहीत. उलट अमेरिकाच युद्धाला घाबरतो. त्यांच्यात युद्ध करण्याची शक्ती नाही.”

First Published on: May 20, 2019 9:50 AM
Exit mobile version