आता PAN Card हरवलं तर नो टेन्शन! केवळ ५ मिनिटांत मिळणार नवं पॅनकार्ड; जाणून घ्या प्रक्रिया

आता PAN Card हरवलं तर नो टेन्शन! केवळ ५ मिनिटांत मिळणार नवं पॅनकार्ड; जाणून घ्या प्रक्रिया

Income Tax Department अर्थात प्राप्तिकर विभागाने जारी केलेले सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड. याला Permanent account number देखील म्हटले जाते. जे सध्याच्या काळात खूप महत्वाचे आहे. कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी पॅनकार्ड असणे बंधनकारक आहे. जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड हरवले असेल तर त्याचे डुप्लिकेट कार्ड बनविण्यात वेळ लागतो. मात्र आता तुमचं टेन्शन कमी होणार आहे.

केंद्र सरकारने नुकतीच नवीन ई-फाइलिंग पोर्टल सुरू केले आहे. ज्यामध्ये तुम्ही ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता, तेही अवघ्या ५ मिनिटांत. नवीन ई-फाईलिंग पोर्टलमध्ये काही अडचण येत असल्याचे समोर आले आहे. ते सुरळीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या नवीन पोर्टलवरून तुम्ही ई-पॅन कार्ड कसे डाउनलोड करू शकता. जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया

पॅनकार्ड आधार कार्डशी जोडणे सरकारने बंधनकारक केले आहे. जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी जोडले नसेल तर १ जुलैपासून तुमचे पॅन कार्ड अवैध मानले जाईल. पॅनकार्ड आधार कार्डशी जोडण्याची शेवटची तारीख ३० जून असून त्यानंतर तुम्हाला दंड देखील केला जाऊ शकतो.


Tokyo Olympics : मनप्रीत सिंग भूषवणार भारताच्या पुरुष हॉकी संघाचे कर्णधारपद; दोन उपकर्णधारांची निवड

First Published on: June 22, 2021 5:08 PM
Exit mobile version