घरक्रीडाTokyo Olympics : मनप्रीत सिंग भूषवणार भारताच्या पुरुष हॉकी संघाचे कर्णधारपद; दोन...

Tokyo Olympics : मनप्रीत सिंग भूषवणार भारताच्या पुरुष हॉकी संघाचे कर्णधारपद; दोन उपकर्णधारांची निवड

Subscribe

भारताने मागील आठवड्यात आपल्या १६ सदस्यीय पुरुष हॉकी संघाची घोषणा केली होती. परंतु, त्यावेळी कर्णधार म्हणून कोणाचीही निवड झाली नव्हती.

आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मनप्रीत सिंगची भारताच्या पुरुष हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. भारताने मागील आठवड्यात आपल्या १६ सदस्यीय पुरुष हॉकी संघाची घोषणा केली होती. परंतु, त्यावेळी कर्णधार म्हणून कोणाचीही निवड झाली नव्हती. मात्र, अपेक्षेनुसार मनप्रीत सिंग या संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. तसेच महिला हॉकी संघाप्रमाणे पुरुष संघासाठीही दोन उपकर्णधारांची नेमणूक झाली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये बिरेंद्र लाक्रा आणि हरमनप्रीत सिंग हे बचावपटू भारताचे उपकर्णधार असतील. या स्पर्धेसाठी भारताचा ‘अ’ गटामध्ये समावेश आहे.

माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट

‘भारतीय संघाचे ऑलिम्पिकमध्ये तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणे हे माझे भाग्य आहे आणि यावेळी मला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. भारतीय हॉकी संघाचे कर्णधारपद भूषवणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मागील काही वर्षांत आम्ही नेतृत्व करू शकतील असे बरेच खेळाडू तयार केले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळातही ऑलिम्पिकसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वतः पूर्णपणे फिट ठेवण्यात आम्हाला यश आले आहे,’ असे मनप्रीत म्हणाला.

- Advertisement -

भारतीय संघ क्रमवारीत चौथ्या स्थानी

मधल्या फळीत खेळणाऱ्या मनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय पुरुष हॉकी संघाने याआधी २०१७ मध्ये आशिया चषक, २०१८ मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१९ मध्ये एफआयएच सिरीज फायनल यांसारख्या स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच भारताने भुवनेश्वर येथे झालेल्या २०१८ हॉकी वर्ल्डकपची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती आणि त्यावेळीही मनप्रीत भारतीय संघाचा कर्णधार होता. मनप्रीतच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -