IIT,NIT मध्ये आता मिळणार मातृभाषेतून इंजिनीअरिंगचे शिक्षण

IIT,NIT मध्ये आता मिळणार मातृभाषेतून इंजिनीअरिंगचे शिक्षण

आयआयटी आणि एनआयटीमधील इंजिनीअरिंगचे शिक्षण पुढच्या शैक्षणिक सत्रापासून मातृभाषेतून मिळण्याची तरतूद शिक्षण मंत्रालयाने नुकतीच केली. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी यासंबंधी बैठक घेतली आणि यावेळी ही बैठक घेतली.

यावेळी असेही सांगण्यात आले की, टेक्निकल शिक्षण विशेषत: इंजिनीअरिंगचे शिक्षण हे मातृभाषेत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला आहे. तर काही आयआयटी आणि एनआयटी संस्थांना निवडण्यात येणार आहे. या झालेल्या बैठकीत असेही निर्देश देण्यात आले की, विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप आणि इतर फेलोशिप विद्यार्थ्यांना वेळेत देण्यात यावी. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी एक हेल्पलाईन नंबर देखील सुरू करण्यात यावा, असा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे.

इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम मातृभाषेत सुरु केल्याने त्याचा फायदा देशातील विद्यार्थ्यांना होईल, असे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले. यासंबंधी त्यांनी आपले विचार सार्वजनिक सभेत आणि सेमिनारमध्ये व्यक्त केले. नवे शिक्षण धोरण २०२० मध्ये विद्यार्थ्याचे सर्व शिक्षण मातृभाषेत व्हावे अशी तरतूद आहे.


ठाकरे सरकार वर्षपूर्ती : उद्धव ठाकरे सपशेल फेल – अविनाश जाधव

First Published on: November 27, 2020 7:43 PM
Exit mobile version