आता तालिबानी उपाशी मरणार; IMF कोट्यवधीची संपत्ती जप्त करणार

आता तालिबानी उपाशी मरणार; IMF कोट्यवधीची संपत्ती जप्त करणार

Afghanistan Crisis: अमेरिकेला मदत करणारे कोर्टात हजर न झाल्यास थेट मृत्यूदंडाची शिक्षा, तालिबानचा इशारा

अफगाणिस्तावर तालिबानी दहशतवादी संघटनेने ताबा मिळवताच तेथील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होतेय. मात्र तालिबान्यांकडून अफगाणमधील संपत्तीची लुटमार करत चैन सुरु आहे. मात्र अफगाणिस्तान तालिबनाच्या ताब्यात जाताच आंतरराष्ट्रीय संघटनांकडून अनेक कायदेशीर बंधने घातली जात आहेत. त्यामुळे अफगाणच्या हिसकावून घेतलेल्या काही संपत्तीवरील हक्क तालिबान्यांना सोडावे लागतील. कारण अमेरिकेनंतर आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने (IMF) आणीबाणीच्या काळात अफगाणिस्तानच्या वापरण्यासाठी ठेवलेली संपत्ती, मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तालिबान्यांवर आता उपाशी मरण्याची वेळ येणार आहे.

आयएमएफच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तान तालिबान्यांच्या ताब्यात गेल्याने या देशाच्या भविष्याबद्दल आत्ता सांगणे कठीण आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थित वापरासाठी ठेवण्यात आलेल्या ३४१६.४३ कोटी रुपयांपेक्षा (४६० कोटी मिलिनय डॉलर) अधिकच्या आर्थिक व्यवहारांवर बंदी आणली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, आयएमएफने अमेरिकेच्या दबावामुळे हा निर्णय घेतला आहे. अमेरिकन अध्यक्ष जो बिडेन तालिबानाच्या संपत्तीच्या वापरावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. यात मंगळवारी अमेरिकेने अफगाणिस्तान सेंट्रल बँक ठेवलेली ७४. २६ हजार कोटी रुपयांचे आरक्षित परकीय चलन जप्त केले आहे. तसेच अमेरिकेने अफगाणिस्ताला रसद पुरवठा करणे बंद केले आहे. त्यामुळे तालिबानी लवकरंच भीकेला लागणार आहेत.

अमेरिकेच्या ट्रेझरी ऑफिसने केले परकीय चलन जप्त

अमेरिकेच्या ट्रेझरी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने अफगाणिस्तान सेंट्रल बँकेत ठेवलेले आरक्षित परकीय चलन जप्त केले आहे. अफगाणिस्तान सेंट्रल बँकेतील अमेरिकेने जप्त केली संपत्ती आता तालिबानला वापरासाठी दिली जाणार नाही. अमेरिका तालिबानवर दबाव वाढविण्यासाठी इतर अनेक निर्बंध टाकण्याचा विचार करत आहे. अफगाण केंद्रीय बँकेचे राज्यपाल अजमल अजमदी यांनी आधीच परकीय चलन रोखण्यासंदर्भात भाष्य केलं होतं. अफगाणिस्तानमधील एकूणच परिस्थितीमुळे तेथे महागाई वाढण्याची शक्यता आहे.


 

First Published on: August 19, 2021 12:49 PM
Exit mobile version