देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरीस जॉन्सन यांच्यात महत्त्वाची बैठक, मोदींनी केलं स्वागत

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरीस जॉन्सन यांच्यात महत्त्वाची बैठक, मोदींनी केलं स्वागत

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यात आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. मोदींनी जॉन्सन यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत केलं आहे. दोन्ही देशांचं धोरणात्मक संरक्षण, राजकारण आणि आर्थिक भागीदारीवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी काल गुजरातच्या अहमदाबाद येथील साबरमती आश्रम येथे भेट देत बापूंच्या फोटोला हार अर्पण केला. त्यानंतर व्हिजिटर्स बुकमध्ये त्यांनी या भेटीनंतरचा अभिप्रायही नमुद केला.

बोरिस जॉन्सन काल गुरुवारी उशिरा दिल्लीत पोहोचले होते. त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. आज पीएम मोदींसोबत त्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. तसेच आज दोन्ही नेते महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत. मोदींनी केलेल्या स्वागताबाबत जॉन्सन यांनी मोदींचे आभार मानले आहेत. या बैठकीत यूकीचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत.

बोरिस जॉन्सन यांनी साबरमती आश्रम येथील दौऱ्यात चरखाही चालवला. महात्मा गांधी यांचे शिष्य बनलेल्या ब्रिटिशन एडमिरलची मुलगी मेडेलीन स्लेड यांची आत्मकथा ही साबरमती आश्रमाच्यावतीने पीएम बोरिस जॉन्सन यांना भेट स्वरूपात देण्यात आले.

या भेटीत रूस आणि युक्रेन यांच्यातील युद्धाबाबतचीही चर्चा होणे अपेक्षित आहे. बिझनेस क्षेत्रातील लीडर्ससोबतही त्यांची बैठक होणे अपेक्षित आहे. दरम्यान, गेल्या वर्षी, जॉन्सन आणि पंतप्रधान मोदी यांनी यूके-भारत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीवर सहमती दर्शवली. यूकेमध्ये ५३० दशलक्ष पौंडहून अधिक गुंतवणूकीची घोषणा केली होती.


हेही वाचा : कुर्ला येथील कथित जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी मलिक यांच्याविरुद्ध 5 हजार पानांचे आरोपपत्र


 

First Published on: April 22, 2022 10:20 AM
Exit mobile version