मोबाईल युजर्ससाठी महत्त्वाची बातमी; 7 जानेवारीपूर्वी हे काम करा पूर्ण, अन्यथा सिम कार्ड ब्लॉक

मोबाईल युजर्ससाठी महत्त्वाची बातमी; 7 जानेवारीपूर्वी हे काम करा पूर्ण, अन्यथा सिम कार्ड ब्लॉक

sim card

नवी दिल्लीः मोबाईल ही आता सामान्यांची गरज झालीय. अनेक जण वेगवेगळ्या म्हणजेच जिओ, व्होडाफोन सारख्या कंपन्यांची सिम कार्ड घेतात, जेणेकरून त्यांना चांगल्या नेटवर्कद्वारे कोणाशीही संपर्क साधण्यात व्यत्यय येणार नाही. पण दूरसंचार विभागाने 7 डिसेंबरला एक आदेश जारी केला होता, ज्यात 9 पेक्षा जास्त सिम कार्ड असलेल्या वापरकर्त्यांना सिम कार्ड पडताळणी करणे अनिवार्य आहे.

दूरसंचार विभागाचा हा नवा नियम गेल्या महिन्यात 7 डिसेंबर रोजी देशभर लागू करण्यात आला होता आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय की हा नियम लागू झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत व्हेरिफिकेशन करावे लागेल. तसे न केल्यास सिम कार्ड बंद करण्याचा आदेश आहे.

1) जर तुमच्या नावावर 9 किंवा त्याहून अधिक सिम कार्ड नोंदणीकृत असतील, तर तुम्हाला ताबडतोब सिम कार्ड व्हेरिफिकेशन 7 जानेवारीपूर्वी करावे लागेल. तुम्ही असे न केल्यास तुमच्या सिम कार्डवरील आईटगोईंग कॉलची सेवा बंद केली जाईल. दुसरीकडे 45 दिवसांत इनकमिंग कॉल्स बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. तुम्ही सिम वापरत नसल्यास तुमच्याकडे सिम सरेंडर करण्याचा पर्याय देखील आहे.

2) सिमची पडताळणी न झाल्यास 60 दिवसांच्या आत असे सिमकार्ड बंद करण्याचे आदेश दूरसंचार विभागाकडून देण्यात आलेत. एक गोष्ट जिथे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, आजारी, आंतरराष्ट्रीय रोमिंग आणि अपंग व्यक्तींना 30 दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळेल.

3) तुम्हा लोकांच्या माहितीसाठी आम्ही सांगतोय की, जर बँक, कायद्याची अंमलबजावणी किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेकडून मोबाईल क्रमांकाबाबत तक्रार असेल, तर ग्राहकांच्या सिमकार्डवरील आईटगोईंग सेवा 5 दिवसांची आहे, तर येणारे 10 दिवस सेवा आणि सिम कार्ड सुरू राहील. त्यानंतर 15 दिवसांत सिम पूर्ण बंद करण्याचे आदेश आहेत.

First Published on: January 6, 2022 11:47 AM
Exit mobile version