श्रीनगर-बारामुल्ला हायवेवर सापडला IED बॉम्ब; सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा

श्रीनगर-बारामुल्ला हायवेवर सापडला IED बॉम्ब; सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा

श्रीनगर-बारामुल्ला हायवेवर सापडला IED बॉम्ब

जम्मू-काश्मीरमध्ये आज पहाटेच्या सुमारास एक मोठा अपघात टळला आहे. श्रीनगर-बारामुल्ला राष्ट्रीय महामार्गावर सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीला आयईडी (IED) सापडल्याचे समोर आले आहे. हे एक्सप्लोझिव्ह टप्पर पट्टनच्या पेट्रोल पंपाजवळील पुलाखाली बसविण्यात आले होते. मात्र, सैन्याने वेळेत IED डिफ्यूज केल्यामुळे मोठा अपघात टळला आहे. दरम्यान, गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार; दहशतवादी ५ ऑगस्ट रोजी घातपात करु शकतील, असा इशारा सुरक्षा यंत्रणेने दिला आहे.

कलम ३७० हटवण्याला १ वर्ष पूर्ण

गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधील ३७० कायदा हटवण्यात आला. याला उद्या एक वर्ष पूर्ण होणार आहे. गुप्तचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी ५ ऑगस्ट रोजी घातपात करु शकतात. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

श्रीनगर जिल्ह्यात कर्फ्यू लागू

मिळालेल्या माहितीनुसार; श्रीनगर जिल्ह्यात सरकारने कर्फ्यू ऑर्डर जारी केली आहे. या आदेशात म्हटले आहे काही फुटीरवादी आणि पाकिस्तानी समर्थित संघटना जिल्ह्यात ५ ऑगस्ट रोजी ‘ब्लॅक डे’ साजरा करणार आहेत. यामुळे श्रीनगर जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला असून हा कर्फ्यू ४ आणि ५ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.


हेही वाचा – ओमानहून ५० हजारांपेक्षा जास्त भारतीयांची घरवापसी! १५ ऑगस्टपर्यंत आणखी १९ उड्डाणं


 

First Published on: August 4, 2020 12:17 PM
Exit mobile version