Coronavirus – बलात्कार झालेल्या तरूणीला कोरोना, आरोपी झाला क्वारंटाईन!

Coronavirus – बलात्कार झालेल्या तरूणीला कोरोना, आरोपी झाला क्वारंटाईन!

देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला आहे. मात्र तरीही कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दररोज कोरोना संदर्भातील नवीन गोष्टी समोर येत आहे. नुकतीच दिल्लीमध्ये एक कोरोनाशी संबंधीत घटना घडली आहे. ही घटना ऐकून सगळेच हादरले आहेत. दिल्लीत एका बलात्कार झालेल्या मुलीलाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आरोपीला जेलमध्येच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. हा आरोपी सध्या तिहार जेलमध्ये आहे. त्यामुळे या आरोपीबरोबर जेलमधील इतर कैद्यांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

दिल्लीमध्ये एका बलात्कार पिडीतेला कोरोनाची लक्षणं दिसली त्यामुळे तीची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. तीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर तीच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीलाही जेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं. त्याच्यासह इतर दोन आरोपींनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. लवकरच त्याची तपासणी करण्यात येणार आहे. सध्या पीडितेवर उपचार सुरू आहेत.

तिहारजेलमध्ये क्वारंटाईन कक्ष

कोरोनाचे वाढते प्रमाण बघता तिहार जेलमध्येही आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. ज्यात तिहार जेलमधील कैद्यांची तपासणी आणि कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचबरोबर नवीन कैद्यांच्या आरोग्य तपासणीवरही प्रशासन लक्ष ठेवून आहे.


हे ही वाचा – मजुरांचे स्थलांतर चिंता वाढवणार,कोरोना गावापर्यंत पोहोचणार – पंतप्रधान मोदी


 

First Published on: May 11, 2020 6:20 PM
Exit mobile version