धक्कादायक: ‘या’ देशात तीन दिवस मृतदेह रस्त्यांवर पडून

धक्कादायक: ‘या’ देशात तीन दिवस मृतदेह रस्त्यांवर पडून

दक्षिण अमेरिकेमधील इक्वाडोर देशातील भयानक परिस्थिती समोर आली आहे. इक्वाडोरमध्ये कोरोनामुळे लोकांचा रस्त्यांवरच मृत्यू झाला आहे. कित्येक दिवस हे मृतदेह रस्त्यावरच पडून होते. इक्वाडोरमधील सैन्याने आणि पोलिसांनी जवळजवळ १५० मृतदेह रस्ते तसंच घरातून गोळा केले आहेत. सरकारने कोरोना विषाणूमुळे ३ हजार ५०० जणांचा मृत्यू होईल, असा इशारा दिला होता. पोलीस टास्क फोर्स आणि सैन्याने तीन दिवसात तब्बल १५० मृतहेह गोळा केले, असं सरकारचे प्रवक्ते जॉर्ज व्हेटेड यांनी सांगितलं.

लॅटिन अमेरिका शहरातील रहिवाशांनी सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसिद्ध करत कोरोनामुळे मरण पावलेले मृतदेह दाखवले. काही जणांनी घरात मरण पावलेल्या लोकांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अधिकाऱ्यांना संदेश दिला. ५१ वर्षीय रोझा रोमेरोने तिचा पती बोलिवर रेयस गमावला आणि त्याचा मृतदेह घराबाहेर काढण्यासाठी त्यांना एक दिवसाची वाट पाहावी लागली. मृतांपैकी कितीजण कोरोना विषाणूने मरण पावले याची अधिकाऱ्यांनी पुष्टी केली नाही.


हेही वाचा – देशापेक्षा धर्म मोठा वाटणाऱ्यांना गोळ्या घाला – राज ठाकरे


दरम्यान, बुधवारी उशिरा सरकारी दूरध्वनीवर प्रसारित झालेल्या संदेशात सरकारच्या प्रवक्त्याने माफी मागितली. ते म्हणाले की, कर्फ्यूमुळे शवगृहातील कामगार मृतदेह काढून टाकण्यास असमर्थ ठरले आहेत. आम्ही चुका मान्य केल्या आहेत आणि ज्यांना आपल्या प्रियजनांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी काही दिवस थांबावे लागले त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत,” असं वाटेड म्हणाले.

 

First Published on: April 4, 2020 1:17 PM
Exit mobile version